खेळ
कोल्हापूरच्या प्रमोद कुडाळेंची HYROX Mumbai मध्ये दमदार कामगिरी; १ तास ३० मिनिटांत आव्हान पूर्ण!
By nisha patil - 9/21/2026 4:40:58 PM
Share This News:
कोल्हापूरच्या प्रमोद कुडाळेंची HYROX Mumbai मध्ये दमदार कामगिरी; १ तास ३० मिनिटांत आव्हान पूर्ण!
कोल्हापूरचे प्रमोद कुडाळे यांनी मुंबई येथे पार पडलेल्या HYROX Mumbai स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत Single Men प्रकारातील आव्हान अवघ्या १ तास ३० मिनिटांत पूर्ण केले. त्यांच्या या कामगिरीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. HYROX ही फिटनेस, ताकद, सहनशक्ती आणि मानसिक जिद्दीची कसोटी पाहणारी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. अशा आव्हानात्मक स्पर्धेत प्रमोद कुडाळे यांनी सातत्यपूर्ण सराव आणि मेहनतीच्या जोरावर हे आव्हान यशस्वीपणे पूर्ण केले.
कोच शिव यादव शिवस्पिरीट यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमोद यांनी स्पर्धेची तयारी केली. योग्य प्रशिक्षण, शिस्तबद्ध फिटनेस रुटीन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर त्यांनी ९० मिनिटांत HYROX Mumbai पूर्ण करण्याची कामगिरी केली.
प्रमोद कुडाळे यांच्या या यशाबद्दल फिटनेस क्षेत्रातून तसेच कोल्हापूरकरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे. त्यांच्या कामगिरीमुळे शहरातील तरुणांमध्ये फिटनेस आणि स्पोर्ट्सविषयी प्रेरणा निर्माण झाली आहे.
कोल्हापूरच्या प्रमोद कुडाळेंची HYROX Mumbai मध्ये दमदार कामगिरी; १ तास ३० मिनिटांत आव्हान पूर्ण!
|