खेळ

कोल्हापूरची कन्या श्रुतिका गुंडपची जपान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड

Kolhapurs daughter Shrutika Gundap


By nisha patil - 8/20/2025 5:26:48 PM
Share This News:



कोल्हापूरची कन्या श्रुतिका गुंडपची जपान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड

प्रतिनिधी ; प्रकाश खतकर  कोल्हापूर : जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील शेणगावची नात व तानाजी गुंडप यांची नात, कु. श्रुतिका गुंडप हिची जपानच्या महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड झाल्याने महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

अवघ्या १६ वर्षांची श्रुतिका सध्या जपानमधील Indian International School मध्ये इयत्ता ११ वीमध्ये शिक्षण घेत आहे. ती Tokyo Titans Cricket Club ची खेळाडू असून प्रशिक्षक अफरोज खानआशिष नेवे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. जपान संघात तिला यष्टीरक्षक व फलंदाज म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

भारतात असताना श्रुतिकाने इचलकरंजी येथील Master Cricket Club मध्ये कोच विनय कोपड यांच्याकडून क्रिकेटचे प्राथमिक धडे घेतले होते. गेली १० वर्षे ती आपल्या कुटुंबासोबत जपानमध्ये वास्तव्यास आहे. तिचे वडील संदीप गुंडप हे केमिकल इंजिनिअर असून जपानमधील एका कंपनीत कन्सल्टन्ट आहेत, तर आई कोमल गुंडप गृहिणी असून धाकटी बहीणही जपानमध्ये शिक्षण घेत आहे.

श्रुतिकाच्या निवडीने संपूर्ण महाराष्ट्रात आणि विशेषतः तिच्या शेणगाव गावी आनंदाचे वातावरण पसरले आहे. जपानमध्ये भारताचे नाव उज्ज्वल करणाऱ्या श्रुतिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.


कोल्हापूरची कन्या श्रुतिका गुंडपची जपान महिला राष्ट्रीय क्रिकेट संघात निवड
Total Views: 119