बातम्या

कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम आजपासून सुरू;

Kolhapurs football season starts from today


By nisha patil - 1/12/2025 3:56:11 PM
Share This News:



कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम आजपासून सुरू; 
 

एआयएफएफच्या नव्या नियमावलीखाली ‘केएसए शाहू छत्रपती फुटबॉल लीग’ला शानदार किक ऑफ


कोल्हापुरातील फुटबॉलप्रेमींच्या प्रतीक्षेचा अखेर अंत—यंदाचा (2025-26) फुटबॉल हंगाम आज, सोमवार 1 डिसेंबरपासून दणक्यात सुरू होत आहे. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे आयोजित ‘केएसए शाहू छत्रपती फुटबॉल लीग’च्या माध्यमातून हंगामाचा अधिकृत किक ऑफ होणार आहे.

सहा महिन्यांच्या दीर्घ हंगामासाठी छत्रपती शाहू स्टेडियम सज्ज झाले असून उद्घाटन समारंभ आज दुपारी 4 वाजता जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या हस्ते होणार आहे. केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या महिला अध्यक्षा सौ. मधुरिमाराजे यांच्यासह डीवायएसपी प्रिया पाटील, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे, केएसएचे माणिक मंडलिक व इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

एआयएफएफ नियमावलीची सक्ती — हंगामासाठी मोठा बदल
यावर्षीपासून कोल्हापूर फुटबॉल हंगामात मोठा बदल लागू होत असून एआयएफएफच्या नियमावलीची सक्ती करण्यात आली आहे. खेळाडू व संघ नोंदणी सीआरएस  नुसार पूर्ण झाली असून संपूर्ण लीग आता सीएमएस (कॉम्पिटिशन मॅनेजमेंट सिस्टीम) पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे प्रत्येक नोंद, निकाल व प्रक्रिया तत्काळ एआयएफएफच्या नोंदीत जमा होणार आहे.

या आधुनिक पद्धतीमुळे लीगची पारदर्शकता, शिस्त आणि स्पर्धेची गुणवत्ता अधिक वाढेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.


कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम आजपासून सुरू;
Total Views: 26