बातम्या
कोल्हापूरच्या वाढीला गती – अजित पवार यांचे संकेत
By nisha patil - 8/26/2025 5:44:48 PM
Share This News:
कोल्हापूरच्या वाढीला गती – अजित पवार यांचे संकेत
कोल्हापूर वाढतेय, आणखी वाढणार आहे. कोल्हापुरात लवकरच नवीन ‘एरिया’ येणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. महापालिकेची नवी इमारत शेंडा पार्क येथे उभारली जाणार असून त्याकरिता एकूण पाच एकर जागा देण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांना त्यांनी दिले.
शहरातील १०० कोटींच्या रस्त्यांसाठी २३ कोटींचा निधी दिला आहे. मात्र रस्ते दर्जेदार नसतील तर चौकशी करूनच उर्वरित निधी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शेंडा पार्कच्या शंभर एकर जागेत आयटी पार्क उभारले जाणार आहे. तसेच कोल्हापूर विमानतळाची धावपट्टी तीन हजार मीटरपर्यंत वाढवण्याच्या दृष्टीने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाशी चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्त भागात आता रस्त्यांसाठी भरावाऐवजी पिलर अथवा डक्ट टाकून रस्ते करण्यात येणार आहेत.
तर खड्डेमय रस्त्यांवर टोल आकारण्यास मनाई असल्याने सर्वोच्च न्यायालयाचा निकाल दाखवा आणि बिनधास्त जा, असा सल्ला अजित पवार यांनी नागरिकांना दिला.
कोल्हापूरच्या वाढीला गती – अजित पवार यांचे संकेत
|