बातम्या
तावडे हॉटेल चौकात उभारणार कोल्हापूरचे नवीन प्रवेशद्वार — तीन कोटींचा निधी जाहीर
By nisha patil - 10/16/2025 3:04:49 PM
Share This News:
तावडे हॉटेल चौकात उभारणार कोल्हापूरचे नवीन प्रवेशद्वार — तीन कोटींचा निधी जाहीर
कोल्हापूर, दि. १६ : शहरातील जुन्या स्वागत कमानीची अवस्था अत्यंत जीर्ण झाल्याने ती धोकादायक बनली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी आज मनपा अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली.
सदर कमानीचे स्ट्रक्चरल ऑडिट केल्यानंतर ती पूर्णपणे उतरवण्याचे आदेश त्यांनी दिले असून, पुढील दोन ते चार दिवसांत ती हटवली जाणार आहे. याऐवजी तावडे हॉटेल चौकात कोल्हापूरचे नवीन, भव्य आणि आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहे.
या प्रवेशद्वाराच्या आराखड्यासाठी डिझाईन स्पर्धा घेण्यात येणार असून, राजर्षी शाहू महाराजांच्या वैभवाला साजेसे स्वरूप देण्यात येईल. या कामासाठी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्यात आल्याची घोषणा आमदार क्षीरसागर यांनी केली.
या पाहणीदरम्यान माजी नगरसेवक सुहास लटोरे, अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, शहर अभियंता रमेश मस्कर, दिलीप देसाई, श्री. हडकर, अविनाश कामते आदी अधिकारी उपस्थित होते.
तावडे हॉटेल चौकात उभारणार कोल्हापूरचे नवीन प्रवेशद्वार — तीन कोटींचा निधी जाहीर
|