बातम्या
कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न दोन वर्षांत मार्गी – आ. क्षीरसागर
By Administrator - 9/16/2025 2:58:37 PM
Share This News:
कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न दोन वर्षांत मार्गी – आ. क्षीरसागर
अभियंता दिनानिमित्त राजेश क्षीरसागर यांची उपस्थिती..
राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आ. राजेश क्षीरसागर यांनी ग्वाही दिली की कोल्हापूर शहरातील आयटी पार्क, टेक्नॉलॉजी सेंटर, डेटा सेंटर, रिंग रोड यांसह सर्व प्रलंबित प्रश्न दोन वर्षांत सोडवले जातील. ते बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडियाच्या कोल्हापूर शाखेत अभियंता दिनानिमित्त बोलत होते.
क्षीरसागर यांनी सांगितले की जागतिक बँकेच्या मदतीने ३,४०० कोटींचा पूर नियंत्रण प्रकल्प सुरू होणार असून यात राधानगरी धरणाचे दरवाजे दुरुस्ती, नदीतील गाळ काढणे, पूरभिंती उभारणे यांचा समावेश असेल. या कार्यक्रमात ज्योती चौगुले, विजय कोंडेकर, प्रताप कोंडेकर, एकनाथ पाटील, एस.एल. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूरचे प्रलंबित प्रश्न दोन वर्षांत मार्गी – आ. क्षीरसागर
|