बातम्या
कोल्हापूरचे खड्डे देशात प्रसिद्ध; ५२ वर्षांनंतरही रस्त्यांचा प्रश्न कायम.
By nisha patil - 8/21/2025 2:39:18 PM
Share This News:
कोल्हापूरचे खड्डे देशात प्रसिद्ध; ५२ वर्षांनंतरही रस्त्यांचा प्रश्न कायम.
शंभर कोटींचा निधी गेला कुठे? — हिंदू महासभेचा सवाल
गेल्या ५२ वर्षांपासून कोल्हापूरच्या रस्त्यांचा प्रश्न सुटलेला नाही. आज कोल्हापूर म्हटलं की रस्त्यांपेक्षा जास्त चर्चा खड्ड्यांचीच होते. कोल्हापूरचे रस्ते आणि कोल्हापूरचे खड्डे आता देशभरात प्रसिद्ध झाले आहेत.
महानगरपालिकेकडे कोट्यवधी रुपयांचा निधी येत असतानाही रस्त्यांचे काम दर्जाहीनच होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भ्रष्टाचारी अधिकारी आणि ठेकेदार संगनमताने रस्त्यांच्या कामात प्रचंड ढपला पाडत असल्याची टीका अखिल भारत हिंदू महासभेच्या वतीने करण्यात आली.
कोल्हापूरचे खड्डे देशात प्रसिद्ध; ५२ वर्षांनंतरही रस्त्यांचा प्रश्न कायम.
|