बातम्या
ऊस हंगामात कोल्हापूरची दणदणीत आघाडी
By nisha patil - 11/20/2025 5:45:16 PM
Share This News:
ऊस हंगामात कोल्हापूरची दणदणीत आघाडी
राज्यात ऊस गाळप हंगाम वेग घेत असून 19 नोव्हेंबरपर्यंत 117.27 लाख टन गाळप आणि 86.81 लाख क्विंटल साखरेचे उत्पादन नोंदले गेले आहे. राज्याचा उतारा 7.4 टक्के आहे.
यात कोल्हापूर विभाग सर्वात आघाडीवर असून 29.61 लाख टन गाळप आणि 25.32 लाख क्विंटल साखर उत्पादन घेत त्याने 8.55 टक्के असा सर्वोच्च उतारा नोंदवला आहे.
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा गाळपामध्ये मोठी वाढ झाली असून राज्यातील 147 कारखान्यांनी हंगामाला सुरुवात केली आहे.
पुणे विभाग 27.57 लाख टन गाळप व 7.96 टक्के उताऱ्यासह दुसऱ्या स्थानी, तर सोलापूर 27.38 लाख टन गाळप व 6.76 टक्के उताऱ्यासह तिसऱ्या स्थानी आहे.
अहमदनगर चौथ्या, छत्रपती संभाजीनगर-पाचव्या, नांदेड-सहाव्या स्थानावर असून अमरावतीत 7.68 टक्के सरस उतारा नोंदला आहे. नागपूर विभागात अद्याप गाळप सुरू झालेले नाही.
ऊस हंगामात कोल्हापूरची दणदणीत आघाडी
|