बातम्या

"दसरा महोत्सवासाठी निधी कमी पडणार नाही – पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन"

Kolhapurs royal Dussehra festival


By nisha patil - 9/20/2025 11:51:07 AM
Share This News:



🌸 कोल्हापूरचा शाही दसरा महोत्सव भव्यतेने साजरा होणार 🌸

कोल्हापूर :  शाही दसरा महोत्सव हा कोल्हापूरच्या परंपरेचा ऐतिहासिक वारसा असून त्याला वेगळी ओळख आहे. यंदा राज्य शासनाने राज्यातील प्रमुख महोत्सवांच्या यादीत कोल्हापूरच्या शाही दसरा महोत्सवाचा समावेश केला नसला तरी हा आपला सन्मान आहे. या महोत्सवाला निधी कमी पडू देणार नाही, सर्वांनी मिळून हा उत्सव यशस्वी करूया, असे आवाहन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शाही दसरा महोत्सवाच्या लोगोचे अनावरण त्यांच्या हस्ते झाले.

📅 महोत्सव कालावधी : २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तयारीची माहिती दिली. आबिटकर म्हणाले, “म्हैसूरच्या दसरा महोत्सवाप्रमाणेच नियोजन करून दरवर्षी यात भर घालून अधिक उत्तम पद्धतीने कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल. देशभरातून भाविक आणि पर्यटकांनी या महोत्सवात सहभागी व्हावे.”

🚍 नवरात्र उत्सवातील सुविधा
    •    लाखो भाविकांच्या सोयीसाठी वाहनतळापासून मंदिरापर्यंत बस सुविधा उपलब्ध करून द्यावी.
    •    अंतर्गत वाहतूक व्यवस्था योग्य ठेवावी.
    •    दर्शन रांगा, सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेसाठी सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी महापालिका व मंदिर प्रशासनाला दिल्या.

🏗️ शहर विकासावर भर

शहरातील कामांच्या गुणवत्तेबाबत नाराजी व्यक्त करत आबिटकर म्हणाले, “महापालिकेने प्राधान्यक्रम ठरवून गुणवत्तापूर्ण कामे करावीत. येत्या काळात शहरात सकारात्मक बदल दिसेल अशी कामे हाती घ्यावीत.”

👉 शाही दसरा महोत्सवाला कोल्हापूरकरांसोबत राज्यभरातील भाविक आणि पर्यटकांची उत्स्फूर्त साथ लाभण्याची अपेक्षा आहे.


"दसरा महोत्सवासाठी निधी कमी पडणार नाही – पालकमंत्र्यांनी दिले आश्वासन"
Total Views: 87