विशेष बातम्या

नागपूर आंदोलनाला कोरे–माने यांचा ठोस पाठिंबा

Kore Manes solid support for Nagpur movement


By nisha patil - 10/12/2025 3:07:00 PM
Share This News:



नागपूर आंदोलनाला कोरे–माने यांचा ठोस पाठिंबा

 “कायमस्वरूपी नियुक्तीसाठी प्रयत्न करू” — आमदारांचे आश्वासन

 नागपूरमध्ये सुरू असलेल्या समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला आज महत्त्वाचा राजकीय आधार मिळाला. आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) आणि दलितमित्र आमदार डॉ. अशोकराव माने (बापू) यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांना सक्रीय पाठिंबा दर्शवला.

आमदारांनी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना “तुमचे प्रश्न न्याय्य आहेत. तुम्हाला शासन सेवेत कायम करण्याबाबत आम्ही शासन दरबारी ठोस प्रयत्न करू,” असे आश्वासन दिले. यामुळे आंदोलकांमध्ये उत्साह आणि समाधानाची भावना निर्माण झाली.

या भेटीदरम्यान संघटनेचे राज्याध्यक्ष योगिता बलाक्षे, राज्य कार्यकारिणी सदस्य महेश पाटील, प्रवीण पाटील, राम यादव, दशरथ लवटे, प्रशांत शेटे, धनंजय भोळे, जयंत सातपुते यांसह अनेक मान्यवर व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


नागपूर आंदोलनाला कोरे–माने यांचा ठोस पाठिंबा
Total Views: 15