शैक्षणिक

क्रीडादिनी कोरगांवकर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती

Korgaonkar High School on Sports Day


By nisha patil - 2/9/2025 12:39:16 PM
Share This News:




क्रीडादिनी कोरगांवकर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती

 आंतरभारती शिक्षण मंडळ संचलित कोरगांवकर हायस्कूल, सदर बाजार येथे राष्ट्रीय क्रीडादिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला पॅरा स्पोर्ट्स अकादमीचे आंतरराष्ट्रीय दिव्यांग खेळाडू उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली.

या प्रसंगी तलवारबाजी व हॅन्डबॉल प्रकारात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जानकी मोकाशी, कृत्रिम पायाच्या साहाय्याने ॲथलेटिक्समध्ये यश मिळवलेली सुप्रिया तावडे आणि भारतीय संघात स्थान मिळवलेले व्हीलचेअर क्रिकेटपटू संतोष रांजगणे यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव कथन केले.
"शरीर अपंग असले तरी मन अभंग ठेवल्यास यश नक्की मिळते," असा संदेश जानकी मोकाशी यांनी विद्यार्थ्यांना दिला. तर सुप्रिया तावडे यांनी "परिस्थितीवर मात करून कृत्रिम पायासह खेळता येते," असे सांगत प्रेरणा दिली. संतोष रांजगणे यांनी भारतीय संघात स्थान मिळणे हेच आयुष्याचे मोठे यश असल्याचे सांगितले.

कार्यक्रमाची सुरुवात जानकी मोकाशी यांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलन व मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली. क्रीडाशिक्षक सदाशिव हाटवळ यांनी प्रास्ताविक करत राष्ट्रीय क्रीडादिनाचे महत्त्व स्पष्ट केले. सई गवळी व सलीम मणियार यांनी मनोगत व्यक्त केले.

संतोष रांजगणे यांनी घेतलेल्या क्रीडा प्रश्नावलीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पर्यवेक्षिका सुरेखा पोवार यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी शीतल गणेशाचर्य, निवेदिता पवार, विद्या बाचणकर, तृप्ती रावराणे आदी मान्यवर उपस्थित होते.


क्रीडादिनी कोरगांवकर हायस्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय खेळाडूंची उपस्थिती
Total Views: 43