बातम्या
कोरीवडे येथील कीर्तन व प्रवचनकार ह.भ.प.तानाजी पाटील यांना पुरस्कार जाहीर
By nisha patil - 6/24/2026 3:47:07 PM
Share This News:
**कोरीवडे येथील कीर्तन व प्रवचनकार ह.भ.प.तानाजी पाटील यांना पुरस्कार जाहीर*
**आजरा(हसन तकीलदार)*:-कोरीवडे तालुका आजरा येथील सुपुत्र व संपूर्ण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कीर्तन व प्रवचनकार ह.भ.प.तानाजी पांडुरंग पाटील यांना उत्कृष्ट कीर्तन, प्रवचन सेवा , सर्वांबद्दल आपुलकी, अडचणीप्रसंगी मदत करणे याची दखल घेत अविष्कार फाऊंडेशन इंडिया,कोल्हापूर यांच्यावतीने त्यांना राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार 2026 ने सन्मानित करण्यात आले आहे.
लोकराजा राजर्षी शाहू पुरस्कार प्राप्त झालेने त्यांचेवर गावासह संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.यावेळी त्यांचा पत्रकार पुंडलिक सुतार, उचंगी येथील धनाजी शिंदे तसेच हाजगोळी येथील दशरथ पंडित,सुलगाव येथील सौ.अस्मिता उत्तम शिवगंड,तसेच हभप अमृत देसाई म्हसवेकर,बाळासो जाधव ,राजू चौगले व ग्रामस्थ यांनी सत्कार केला.ह.भ.प.तानाजी पाटील हे श्री गुरु बाबासाहेब आजरेकर फडाचे ज्येष्ठ व निष्ठावंत कीर्तन व प्रवचनकार असून आतापर्यंत त्यांनी 15 वर्षे पंढरपूरला महिनावारी केली आहे.तर 25 वर्षे आषाढी पालखी सोहळा पूर्ण केला आहे.पंढरपूर ते आळंदी कार्तिक पायी वारी 25 वर्षे तर आळंदी ते पंढरपूर आषाढी कार्तिक वारी 25 वर्षे पूर्ण केली आहे.तर 22 वर्षे कीर्तन व प्रवचन सेवा केली असून सुमारे 3 वर्षे श्री गुरु गोविंद कोंडकर आजरेकर फड प्रमुख यांचे त्यांना श्रवण घडले. आजऱ्याच्या कोंडकर महाराजांनीच त्यांना कीर्तन सेवेला उभे केले.त्यांच्या घरातील सर्वजण वारकरी असून घराला त्यांनी वैष्णव सदन असे नाव दिले आहे.गेल्या वर्षी महाराजांना आजरेकर दिंडीचा निर्मल पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्राप्त झाला आहे.महाराजांनी संपूर्ण महाराष्ट्रात कीर्तन व प्रवचन सेवा केली असून यासाठी त्यांना वडील स्व.हभप पांडुरंग पाटील व आई हभप स्व.मंजुळा पांडूरंग पाटील यांचा आशीर्वाद लाभला आहे.तर पत्नी,मुले,सुना,नातवंडे ,ग्रामस्थ, आजरेकर फडावरील सर्व मंडळी,समस्त वारकरी संप्रदाय ,नातेवाईक यांचे योगदान लाभले. योग्य व्यक्ती,योग्य पुरस्कार असा सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय संपूर्ण वारकरी संप्रदाय समाधान व्यक्त करत आहे.
कोरीवडे येथील कीर्तन व प्रवचनकार ह.भ.प.तानाजी पाटील यांना पुरस्कार जाहीर
|