बातम्या

सीपीआरच्या रुग्णांना कृष्णा डायग्नोस्टिक देणार माफक दरात एमआरआयची सुविधा  - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

Krishna Diagnostics will provide MRI facility to CPR patients


By nisha patil - 6/16/2025 10:19:48 PM
Share This News:



सीपीआरच्या रुग्णांना कृष्णा डायग्नोस्टिक देणार माफक दरात एमआरआयची सुविधा  - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

कोल्हापूर, : सीपीआरच्या रुग्णांना कृष्णा डायग्नोस्टिक माफक दरात एमआरआयची सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

सीपीआर मध्ये सीटी स्कॅन 128 स्लाईसची अद्ययावत सुविधा सध्या उपलब्ध आहे. तथापि, नवीन एमआरआय मशिन बसवून ते काम पूर्ण होण्यासाठी 3 महिने अवधी आहे. याचा विचार करुन रुग्णांच्या सोयीसाठी सीपीआर आणि कृष्णा डायग्नोस्टीक कंपनी यांच्या संयुक्त सहकार्याने सीपीआरमधील डॉक्टरांच्या सल्ल्याने सीपीआरच्या गरजू रुग्णांना 507, ई वॉर्ड, कदमवाडी येथील कृष्णा डायग्नोस्टीक सेंटर मध्ये केवळ 3 हजार रुपये इतक्या अल्प दरात थ्री टेस्ला एमआरआय ची सुविधा तसेच तेथे पोहोचण्यासाठी वाहन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यामुळे एमआरआय अभावी रुग्णांची गैरसोय टाळली जाऊन त्यांची चांगली सोय होणार असल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. सीपीआर मधील नूतनीकरण कामाच्या आढावा बैठकीनंतर त्यांनी ही माहिती दिली. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाने याचा समन्वय साधण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी सीपीआरचे अधिष्ठाता डॉ.एस. एस. मोरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र मदने, सहयोगी प्राध्यापक डॉ.शिशिर मिरगुंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश कांबळे तसेच कृष्णा डायग्नोस्टिक चे नवनाथ शिंगाडे उपस्थित होते.


सीपीआरच्या रुग्णांना कृष्णा डायग्नोस्टिक देणार माफक दरात एमआरआयची सुविधा  - वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती
Total Views: 62