बातम्या

कृष्णराज महाडिक यांच्याकडून गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Krishnaraj Mahadik distributes essential items to needy families


By nisha patil - 9/22/2026 7:54:20 PM
Share This News:



कृष्णराज महाडिक यांच्याकडून गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती शिवाजी चौकातील महागणपतीच्या मंडपात कृष्णराज महाडिक यांनी गरजू  कुटूंबियांना केले धान्याचे वाटप

भारतीय जनता पार्टी हा संस्कृती असणारा पक्ष आहे. या संस्कृतीचे पालन करणे हे प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. देव, देश आणि धर्म पालन करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्या अनुषंगाने आज भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून  युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी महागणपतीच्या मंडपात गरजू  कुटूंबियांना तेल, कडधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. दरम्यान कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते महागणपतीची आरती संपन्न झाली.
 

भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवाजी तरूण मंडळाच्या महागणपतीचे रांगेत उभे राहून दर्शन घेतले. त्यानंतर कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते महागणपतीची आरती झाली. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना दिर्घायुष्य लाभावे, अशी प्रार्थना महाडिक यांनी केली. त्यानंतर त्यांनी, मंडळाचे उपाध्यक्ष सुहास भेंडे, ट्रस्टी गणेश वळंजू, अमित पाटील, राकेश वडणगेकर, नितीन पाटील, सागर पोवार, अमर कोठावळे, ऍड. प्रताप जाधव यांच्याकडून मंडळाच्या सामाजिक कार्याची आणि विविध उपक्रमांविषयी माहिती घेतली. दरम्यान महापौर रूपाराणी निकम, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, नगरसेवक प्रमोद देसाई, रिंंकू देसाई, सुनील वाडकर, नगरसेविका माधुरी नकाते, किरण नकाते, करण जाधव, अभय तेंडुलकर, पाचगावचे महेश पाटील यांच्या हस्ते गरजूंना तेल, कडधान्य, अशा विविध प्रकारच्या धान्याचे वाटप केले.

 प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम राबवले असून, त्याचाच एक भाग म्हणून आपण गरजूंना धान्य वाटप उपक्रम घेतला. त्यामध्ये नगरसेवक आणि युवा मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी सहाय्य केल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. महागणपतीच्या आशिर्वादातूनच आपण हा उपक्रम राबवल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले. यावेळी भाजप युवा मोर्चाचे पदाधिकारी आणि शिवाजी चौक तरूण मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


कृष्णराज महाडिक यांच्याकडून गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
Total Views: 11