बातम्या

कृष्णराज महाडिक यांचा राज्यव्यापी स्वच्छता उपक्रम : वुलू कंपनीसोबत करार”

Krishnaraj Mahadiks statewide cleanliness initiative


By nisha patil - 11/26/2025 4:41:32 PM
Share This News:



कृष्णराज महाडिक यांचा राज्यव्यापी स्वच्छता उपक्रम : वुलू कंपनीसोबत करार”

 “परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक; 

सार्वजनिकराज्यभरातील गर्दीच्या ठिकाणी आणि पर्यटनस्थळी दर्जेदार सार्वजनिक शौचालये उभारण्यासाठी युथ आयकॉन कृष्णराज महाडिक यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. देशभर आधुनिक शौचालये उभारण्यात अग्रगण्य असलेल्या वुलू कंपनीसोबत त्यांनी याबाबत करार केला आहे. या माध्यमातून महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये, महामार्गांवर, पर्यटनस्थळांवर आणि सार्वजनिक ठिकाणी शौचालयांची उभारणी करण्यात येणार आहे.

या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यासाठी कृष्णराज महाडिक यांनी मुंबईतील मंत्रालयात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. राज्यातील बसस्थानकांवर महामंडळाच्यावतीने शौचालयं उभारण्याचे नियोजनही बैठकीत मांडण्यात आले. तसेच सार्वजनिक ठिकाणी आणि पर्यटनस्थळी होणाऱ्या गैरसोयीबाबत मंत्री सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली.

महाडिक यांनी सांगितले की, “सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच राज्यभर शौचालय उभारणीला सुरूवात करण्यात येईल. नागरिकांच्या मूलभूत सोयीसाठी हा प्रकल्प महत्वाचा ठरणार आहे.”


कृष्णराज महाडिक यांचा राज्यव्यापी स्वच्छता उपक्रम : वुलू कंपनीसोबत करार”
Total Views: 14