विशेष बातम्या
कृष्णात पिंगळे यांची पुणे DCP पदी निवड
By nisha patil - 7/21/2025 2:28:04 PM
Share This News:
कृष्णात पिंगळे यांची पुणे DCP पदी निवड
कसबा बावड्याच्या मातीतून घडलेले आणि आपल्या कार्यकुशलतेने राज्यात नावलौकिक मिळवलेले कृष्णात पिंगळे साहेब यांची पुणे पोलीस उपायुक्त (DCP), पोलीस अधीक्षक व अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्स या अत्यंत जबाबदारीच्या पदावर नुकतीच नियुक्ती झाली आहे.
या निवडीबद्दल संजय पटकारे (लाडू) व सकल धनगर समाजाच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले असून, त्यांना त्यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
🔹 "मा. पिंगळे साहेब यांची अशीच उत्तरोत्तर प्रगती व्हावी, हीच मन:पूर्वक सदिच्छा!"
🔹 या प्रसंगी मित्रपरिवार आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर निवड ही केवळ कसबा बावड्याच नव्हे तर संपूर्ण समाजासाठी अभिमानाची बाब आहे.
कृष्णात पिंगळे यांची पुणे DCP पदी निवड
|