बातम्या
कोल्हापुरात सौंदर्याचा महाउत्सव! ‘ब्रायडल मेकअप क्वीन 2026’ ग्रँड फिनालेकडे सर्वांचे लक्ष”
By nisha patil - 12/4/2026 12:04:14 AM
Share This News:
“कोल्हापुरात सौंदर्याचा महाउत्सव! ‘ब्रायडल मेकअप क्वीन 2026’ ग्रँड फिनालेकडे सर्वांचे लक्ष”
कोल्हापूरमध्ये सौंदर्य, कला आणि आत्मविश्वासाचा अनोखा संगम अनुभवायला मिळत असून ‘Face of Maharashtra Bridal Makeup Queen 2026’ ही भव्य स्पर्धा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. Krishna Foundation च्या वतीने आयोजित या उपक्रमामागे संस्थापिका अध्यक्षा Sonali Rajput यांची संकल्पना असून, मेकअप आर्टिस्ट्ससाठी हे एक मोठं व्यासपीठ ठरत आहे.

स्पर्धेअंतर्गत 11 एप्रिल रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत Be On It Dance Academy येथे ग्रुमिंग सेशन पार पडणार आहे. या सेशनमध्ये सहभागी मेकअप आर्टिस्ट्सना तज्ज्ञांकडून विशेष प्रशिक्षण व मार्गदर्शन दिले जाणार आहे, ज्यामुळे त्यांची कला अधिक प्रभावीपणे सादर करता येईल.

यानंतर 12 एप्रिल रोजी सायंकाळी 5 वाजता Hotel Blooming Soul येथे ग्रँड फिनाले रंगणार असून, स्पर्धकांना आपल्या कौशल्याचा थरारक परफॉर्मन्स सादर करण्याची संधी मिळणार आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक खास आकर्षण म्हणजे 4 ते 6 आणि 7 ते 14 वयोगटातील मुलांसाठी आयोजित ‘Kids Fashion Walk’. यामुळे लहानग्यांनाही आत्मविश्वासाने रॅम्पवर चालण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांचीही घोषणा करण्यात आली आहे. प्रथम क्रमांकाच्या विजेत्याला बाली ट्रिप, द्वितीय क्रमांकासाठी Aditya Jewellers कडून 16 हजार रुपये किमतीची चांदीची गणेश मूर्ती, तर तृतीय क्रमांकासाठी Vankundre Kitchen कडून 10 हजार रुपये किमतीचा डिनर सेट देण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रातील प्रायोजकांचा सहभाग लाभलेल्या या भव्य सोहळ्यास मीडिया पार्टनर म्हणून Taara News ची साथ मिळाली आहे.
मेकअप आर्टिस्ट्स आणि इच्छुक स्पर्धकांसाठी ही एक सुवर्णसंधी असून, आपल्या कलेला मोठं व्यासपीठ मिळवण्यासाठी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
कोल्हापुरात सौंदर्याचा महाउत्सव! ‘ब्रायडल मेकअप क्वीन 2026’ ग्रँड फिनालेकडे सर्वांचे लक्ष”
|