कृषी
पंचायत समिती आजरा व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रम संपन्न*
By nisha patil - 2/7/2026 12:33:04 AM
Share This News:
**पंचायत समिती आजरा व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रम संपन्न*
**आजरा(हसन तकीलदार)*:-1जुलै कृषी दिन म्हणून साजरा केला जातो त्यानिमित्ताने पंचायत समिती आजरा व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती आजरा येथे कृषी दिन कार्यक्रम उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. जयश्री गाडे होत्या यावेळी उप सभापती सौ. यशोदा पोवार, जि. प. सदस्य शिरीष देसाई, प.स. सदस्य समीर पारदे, उप विभागीय कृषी अधिकारी किरण पाटील , सहायक गट विकास अधिकारी सुरेश पुजारी, कृषी अधिकारी दिनेश शेटे, तालुका कृषी अधिकारी भूषण पाटील, विस्तार अधिकारी पृथ्वीराज चव्हाण, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. परशुराम मुत्तेफोड व पशुवैद्यकीय अधिकारी पि.डी.ढेकळे,मंडळ कृषी अधिकारी फुले व कृषी विभागाकडील अधिकारी व कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी व महिला उपस्थित होत्या .
सुरवातीस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वस्तंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलन करून मान्यवरांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्ताविक सहायक गट विकास अधिकारी सुरेश पुजारी यांनी केले. यानंतर तालुका पातळीवर भात, भुईमूग, नाचणा पीक स्पर्धेमध्ये प्रथम, द्वितीय तृतीय क्रमांक प्राप्त शेतकरी, कृषी विभागाकडील विविध शासकीय योजनांमधील पुरस्कार प्राप्त शेतकरी, जिल्हा परिषदे कडील कृषी विभागाकडील विविध योजनातील अनुदान प्राप्त शेतकरी तसेच पशुसंवर्धन विभागातील विविध योजनांमध्ये लाभधारक शेतकऱ्यांना प्रमाणपत्रे देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी किरण पाटील यांनी शासनाच्या कृषी विभागाकडील विविध योजनांची माहिती दिली. पंचायत समिती सदस्य समीर पारदे यांनी "आज सन्मानित केलेले शेतकरी हे या सन्मानास खऱ्या अर्थाने पात्र असल्याचे सांगितले." यावेळी बोलताना पंचायत समितीच्या उपसभापती सौ.यशोदा पोवार या म्हणाल्या की, "कृषी विभाग व पशुसंवर्धन विभाग यांनी संयुक्तपणे शेतकऱ्यांच्या हिताच्या योजना ताळागाळापर्यंत पोहोचवल्यास शेतकऱ्यांची जीवनात खऱ्या अर्थाने उन्नती व समृद्धी येईल." जिल्हा परिषद सदस्य शिरीष देसाई यांनी "कै.वसंतरावजी नाईक यांनी शेतकऱ्यांसाठी शेतीमध्ये राबवलेल्या विविध कायद्यांचा, योजनांचा व उपक्रमांचा उल्लेख करून शेतकऱ्याच्या आयुष्यात नंदनवन फुलवण्यासाठी कशाप्रकारे त्यांच्या कारकीर्दीत मनापासून काम केले याचे सविस्तर मार्गदर्शन करून आजच्या काळातही त्यांच्या कार्याची व विचारांची खऱ्या अर्थाने गरज असल्याचे प्रतिपादन केले. अध्यक्षीय भाषणात सभापती सौ.जयश्री गाडे यांनी "यापुढे शेती हा उद्योग मानून शेतकऱ्याने आधुनिक शेतीचा अंगीकार करून विविध योजनांचा लाभ घ्यावा व आपल्या शेतीचे उत्पादन वाढवून आर्थिक जीवनमान उंचवावे" तसेच महिलांनीही यापुढे शेतीमध्ये शेतकरी गट स्थापन करून शेती उद्योगांमध्ये आपले स्वावलंबन शोधावे असे आवाहन केले. कार्यक्रमाचे आभार कृषी अधिकारी दिनेश शेटे यांनी मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मारुती डेळेकर यांनी केले.
पंचायत समिती आजरा व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन कार्यक्रम संपन्न*
|