बातम्या
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आजरा तालुक्यात नैसर्गिकशेती शेतीशाळा वर्ग कार्यक्रम संपन्न
By nisha patil - 6/16/2026 8:04:48 PM
Share This News:
**कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आजरा तालुक्यात नैसर्गिकशेती शेतीशाळा वर्ग कार्यक्रम संपन्न*
**आजरा(हसन तकीलदार)*:- कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आजरा तालुक्यातील दाभिल, सुलगाव येथे खरीप हंगाम भात पीक नैसर्गिकशेती शेतीशाळा तसेच आरदाळ येथे नाचणी पीक नैसर्गिकशेती शेतीशाळावर्ग कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज पाटील (सरपंच दाभिल) होते तर सौ.रुपाली पाटील (सरपंच आरदाळ )तसेच सौ. नंदिनी डोंगरे (सदस्या सुलगाव )यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात डॉक्टर शैलेश कुंभार (प्रभारी अधिकारी कृषी संशोधन केंद्र,राधानगरी )यांनी भाताच्या विविध जाती, नैसर्गिक पद्धतीने बीज प्रक्रियेचे महत्त्व, बिजामृत तयार करण्याची पद्धत व बीजप्रक्रिया पद्धत, जमिनीची मशागत, बियाणे प्रमाण इत्यादी बाबत शेतकऱ्यांना सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले.
डॉक्टर योगेश बन (प्रमुख नाचणी संशोधन प्रकल्प विभागीय कृषी संशोधन केंद्र,कोल्हापूर) यांनी नाचणी पिकाच्या विविध जाती, बियाणे बीज प्रक्रिया, जमीन तयार करणे, गादीवाफे तयार करणे,लागवड पद्धती, अल निनो उपाय योजना इत्यादी बाबत शेतकऱ्यांना माहिती दिली.तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत शाश्वत शेतीसाठी सुरू असलेल्या "खेत बचाव अभियान व संतुलित खत वापर जागरूकता अभियान" कार्यक्रमांतर्गत सेंद्रिय शेती, माती परीक्षण, जीवाणू खते, विद्राव्य खते वापर, हिरवळीची खते व संतुलित खत मात्रा वापर याबाबत शास्त्रज्ञांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठाने प्रसारित केलेल्या माहितीपत्रकाचे शेतकरी बंधूंना वाटप करण्यात आले.
किरण पाटील (उपविभागीय कृषी अधिकारी, गडहिंग्लज )यांनी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच बियाणे उपलब्धता इत्यादी बाबत मार्गदर्शन केले.
सौ.मनीषा पाटील (सहाय्यक कृषी अधिकारी) यांनी पाणी फाउंडेशन अंतर्गत गट स्थापना व उपक्रमाबाबत माहिती दिली.
अमित यमगेकर (सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक) यांनी नैसर्गिक शेती शेतीशाळा संकल्पना व शेती शाळेच्या सहा वर्गांमध्ये शिकायच्या बाबी याबाबत प्रास्ताविक केले.
यावेळी कमलाकर पाटील, नामदेव पाटील, जनार्दन पाटकर, नंदकुमार वाजे, सुधा कांबळे,पूनम गायकवाड, विजया वर्देकर,संजय डोंगरे,पुनम कोंडुसकर,अंतू पाटील, सचिन पाटील,महादेव पुंडपळ, गीता पाटील,सुरेखा काटवळ आदीजण उपस्थित होते.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा अंतर्गत आजरा तालुक्यात नैसर्गिकशेती शेतीशाळा वर्ग कार्यक्रम संपन्न
|