बातम्या

जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न....

Krushi1


By nisha patil - 6/26/2026 1:44:47 PM
Share This News:



जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न....

सिंधुदुर्गनगरी, गवस शुभम ✒️:पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या निवारणासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पीक विमा आढावा व तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न झाली.

बैठकीत नव्याने निर्माण झालेल्या ११ महसूल मंडळांमध्ये स्वयंचलित हवामान केंद्रे उभारण्याबाबत चर्चा करण्यात आली. स्कायमेट वेदर सर्व्हिसेसने ही केंद्रे ३० जून २०२६ पर्यंत कार्यान्वित करावीत, असे निर्देश समितीने दिले.

आंबिया बहार २०२५-२६ अंतर्गत काजू व आंबा पिकांच्या संरक्षण कालावधीसंदर्भातील परिगणना अहवाल व संयुक्त क्षेत्र पडताळणी अहवाल ३० जूनपर्यंत सादर करण्याचे निर्देश भारतीय कृषी विमा कंपनीला देण्यात आले. तसेच हवामान केंद्रांच्या कार्यपद्धतीबाबत शेतकऱ्यांकडून प्राप्त तक्रारींची तपासणी करण्याच्या सूचना संबंधित यंत्रणांना देण्यात आल्या.

योजनेत आवश्यक सुधारणा व शेतकऱ्यांच्या सूचनांबाबतचा अहवाल राज्य शासनाकडे पाठविण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे, विमा कंपनीचे प्रतिनिधी, संबंधित विभागांचे अधिकारी आणि शेतकरी प्रतिनिधी उपस्थित होते.


जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समितीची बैठक संपन्न....
Total Views: 9