बातम्या

के.एस.बी.पी. पार्क परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

Ksbp


By nisha patil - 10/4/2026 6:23:55 PM
Share This News:



के.एस.बी.पी. पार्क परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई

कोल्हापूर ता.09 : महापालिकेच्या विभागीय कार्यालय क्रं.3 राजारामपुरी व अतिक्रमण निर्मुलन पथकामार्फत आज के.एस.बी.पी. पार्क परिसर या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाई वेळी 2 लो़खडी अँगल, 1 टेबल, 2 हातगाडी, 4 काउंटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाई वेळी 19 हातगाडया मालकांनी स्वता:हून काढून घेतल्या.

 

            सोमवारी झालेल्या जनता दरबारमध्ये अतिक्रमणाबाबत तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाच्या अनुषंगाने व महापौर सौ.रुपाराणी निकम यांनी दिलेल्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागामार्फत हि कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान 1 जेसीबी, 2 ट्रॅक्टर ट्रॉली व 1 डंपरचा वापर करण्यात आला.

 

            सदरची कारवाई महापौर सौ.रुपाराणी निकम यांच्या आदेशाने, अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर, उप-आयुक्त किरणकुमार धनवाडे, सहा.आयुक्त जयंत जावडेकर, शहर अभियंता रमेश मस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली, उप-शहर अभियंता अरुण गुजर, अतिक्रमण प्रमुख प्रफुल्ल कांबळे, कनिष्ठ लिपीक सजन नागलोत, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व विभागीय कार्यालय क्र.03 कडील कर्मचा-यांच्या पथकाकडून संयुक्तीक करण्यात आली.

 

तरी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने येथून पुढेही शहरामध्ये अनधिकृत फेरीवाले व रोडवरील दुकाना बाहेर लावण्यात आलेल्या अनाधिकृत शेडवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे संबंधीत दुकान धारकांनी व फेरीवाल्यांनी आपले अनाधिकृत असलेले अतिक्रमण स्वत: काढून घ्यावे असे आवाहन महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.


के.एस.बी.पी. पार्क परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाई
Total Views: 16