बातम्या

कुमार विद्यामंदिर आवळी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न

Kumar Vidyamandir Awali alumni meet concludes


By nisha patil - 6/5/2025 12:34:01 AM
Share This News:



कुमार विद्यामंदिर आवळी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
 

बोरपाडले  आवळी येथील कुमार विद्यामंदिर आवळी ता पन्हाळा येथील 1989-1990 च्या इयत्ता 7 वी उत्तीर्ण विदयार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला. आज तुम्ही सर्वजणांनी आम्हा गुरुजणांचा सत्कार केलात. आपण सर्वजण आपल्या जीवनामध्ये यशस्वी झाल्याचे पाहून शिक्षक पेशा स्वीकारल्याचे समाधान वाटते असे मत शाळेचे माजी शिक्षक जयसिंग पाटील यांनी व्यक्त केले ते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी विदयार्थ्यांनी सामुदायिकरित्या शालेय प्रार्थना गायली. सर्व विदयार्थी व विदयार्थीनी नी शालेय जीवनातील विविध प्रसंग आपल्या मनोगताद्वारे उलगडले. शिक्षकांविषयी व शाळेविषयी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली. या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त शिक्षक श्री शि. ग. पाटील, श्री. राजाराम पाटील, श्री शंकर हरी पाटील उपस्थित होते.

या सर्वानी  विदयार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी मच्छिंद्र पाटील, दत्तात्रय पाटील, संजय पाटील, महादेव पोवार, सुरेश पाटील, वैशाली पाटील, बजरंग पाटील,शोभा बिळासकर, माया पाटील, सुरेश चौगुले, सुरेश पाटील, राजाराम पाटील, छाया बिळासकर, रंजना पाटील,सोनाली यादव, कल्पना कदम, सुशीला क्षीरसागर, शशिकांत चव्हाण,सर्व विदयार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक शोभा बिलासकर पाटील यांनी केले, सूत्रसंचलन  जयवंत पाटील यांनी तर आभार सयाजी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.


कुमार विद्यामंदिर आवळी माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न
Total Views: 209