खेळ
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत शहाजी कॉलेजच्या कुणाल दरवानची निवड
By nisha patil - 9/10/2025 4:45:57 PM
Share This News:
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत शहाजी कॉलेजच्या कुणाल दरवानची निवड
कोल्हापूर दि: सातारा येथे झालेल्या शिवाजी विद्यापीठ आंतर विभागीय मल्लखांब स्पर्धेत उच्चतम कामगिरी करीत दसरा चौक येथील श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाचा राष्ट्रीय मल्लखांब खेळाडू कु. कुणाल दरवान याची निवड सेलम, तामिळ नाडू येथे 24 ते 27 ऑक्टोबर 2025 अखेर होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेसाठी झाली.
कुणाल हा सतत पाच वर्ष शिवाजी विद्यापीठाचे प्रतिनिधी करत आहे. दोन वेळा अखिल भारतीय स्तरावर सुवर्णपदकही पटकावले आहे.त्याला संस्थेचे व्हॉइस चीफ पेट्रन व चेअरमन मानसिंग बोंद्रे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण, जिमखाना प्रमुख प्रा. डॉ. प्रशांत पाटील, प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले व प्रशिक्षक विशाल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेत शहाजी कॉलेजच्या कुणाल दरवानची निवड
|