बातम्या
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र : जरांगे पाटील यांचा स्पष्ट संदेश
By Administrator - 8/9/2025 5:40:52 PM
Share This News:
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र : जरांगे पाटील यांचा स्पष्ट संदेश
महाराष्ट्र सरकारने मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. ३ सप्टेंबरच्या जीआरमध्ये प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी नियमावलीही जाहीर करण्यात आली आहे.
जरांगे पाटील म्हणाले की, शेती करणारा म्हणजे कुणबी, असा मराठा जातीचा अर्थ आहे. जीआरनुसार ज्या मराठ्यांना ओबीसी आरक्षणाचा हक्क आहे, त्यांना प्रमाणपत्र मिळेल. पाटीलांनी स्पष्ट केले की, समाजात काहीही अडथळे निर्माण करणाऱ्यांनी बोलू नये; जीआरला कोर्टात चॅलेंज करूनही आरक्षण रद्द होणार नाही.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र : जरांगे पाटील यांचा स्पष्ट संदेश
|