बातम्या
Lcb चा गावठी दारू अड्ड्यावर छापा.
By nisha patil - 6/20/2025 6:50:37 PM
Share This News:
Lcb चा गावठी दारू अड्ड्यावर छापा.
सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल केला नष्ट
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोरेवाडी कंजारभाट वसाहतीत आज पहाटे गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या पाच अड्ड्यांवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे पाच लाख एकवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे.यामध्ये ३८०० लिटर कच्चे रसायन, ५९०० लिटर पक्के रसायन, ३४० लिटर तयार गावठी दारू, ३४ पत्र्याची बॅरेल्स, दोन सिमेंट टाक्या, २९ प्लास्टिक पाईप्स आणि दोन टन जळाऊ लाकूड यांचा समावेश आहे.
याप्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी रोहित प्रकाश माटुंगे, मनोज मोहन मी, प्रकाश जॅक्सन बागडे, विजय जॅक्सन बागडे आणि प्रमोद सुनील बागडे या पाच स्थानिक आरोपींना अटक करण्यात आली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह परशुराम गुजरे, गजानन गुरव, संतोष बर्गे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, राजू कांबळे, योगेश गोसावी, शिवानंद मठपती आणि अरविंद पाटील यांनी सहभाग घेतला
Lcb चा गावठी दारू अड्ड्यावर छापा.
|