ताज्या बातम्या
लॅब टेक्निशियन्स नियंत्रण कायद्याला मार्च अधिवेशनात मंजुरीचे आश्वासन
By nisha patil - 12/1/2026 5:39:04 PM
Share This News:
कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊ सभागृहात असोसिएशन ऑफ क्लिनिकल लॅबोरेटरी अॅनालिसिस अँड प्रॅक्टिशनर (अक्लॅप) संघटनेच्या १३व्या राज्यस्तरीय परिषदेच्या दुसऱ्या सत्राचा उद्घाटन सोहळा उत्तमरित्या संपन्न झाला.
सध्याच्या काळात लॅब टेक्निशियन्सकडे अनेक अत्याधुनिक सोयी-सुविधा, मशिनरी व साधने उपलब्ध असली, तरी अद्याप कोणताही नियंत्रण कायदा अस्तित्वात नाही. संघटनेच्या माध्यमातून पदाधिकारी अशा कायद्याची सातत्याने मागणी करत आहेत. राज्यातील महायुती शासनाने आणि व्यक्तिशः आरोग्य मंत्री म्हणून मी याबाबत गांभीर्याने विचार करून शासकीय स्तरावर आवश्यक ती कार्यवाही करू. त्याला अंतिम स्वरूप देऊन लॅब टेक्निशियन्स नियंत्रण कायदा तयार करून येत्या मार्च महिन्यातील अधिवेशनात हा महत्त्वपूर्ण कायदा मंजूर केला जाईल, असे याप्रसंगी बोलताना नमूद केले.
तसेच सर्वसामान्य रुग्णांवर योग्य औषधोपचार झाले पाहिजेत. त्यासाठी अचूक रोगनिदान होणे आवश्यक आहे. त्यामुळे हे काम लॅब टेक्निशियन्सकडून चांगल्या पद्धतीने व्हावे, यासाठी डॉक्टर, रुग्ण, लॅब टेक्निशियन्स संघटना आणि सरकार यांच्या समन्वयातून येत्या अधिवेशनात प्रयोगशाळा नियंत्रण व नियमन कायदा मंजूर करण्याचे आश्वासन देखील दिले.
याप्रसंगी अक्लॅप संघटनेचे अध्यक्ष मा. प्रशांत गुळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मा. विजय बलुगडे, मा. शरद एकल, मा. पंडित जाधव, मा. राजेंद्र निगवे, मा. मुकुंद पानारी, मा. राजीव पाटील, मा. सागर बर्गे, मा. समीर जमादार, मा. बाहुबली पाटील, मा. धनंजय वाडकर, मा. विजय गवळी, मा. शहाजी किरोळकर तसेच राज्यभरातील सुमारे दोन हजारहून अधिक लॅब टेक्निशियन्स उपस्थित होते.
लॅब टेक्निशियन्स नियंत्रण कायद्याला मार्च अधिवेशनात मंजुरीचे आश्वासन
|