बातम्या
घरफाळा सवलत योजना 80 टक्के सवलतीचा शेवटचा दिवस
By Administrator - 3/31/2026 12:36:58 PM
Share This News:
घरफाळा सवलत योजना 80 टक्के सवलतीचा शेवटचा दिवस
घरफाळा दंड सवलत योजनेच्या पाचव्या दिवशी 1.83 कोटींची वसुली
कोल्हापूर ता.30 : महानगरपालिका करआकारणी व वसुली (घरफाळा) विभागाने शहरातील मिळकतकर थकबाकीदारांना थकबाकीचे दंड व्याजामध्ये चालू मागणीसह थकबाकीची रक्कम एक रक्कमी भरणा केल्यास दंडव्याजामध्ये 80 टक्के सवलत योजना जाहीर केली आहे.
या सवलत योजनेत आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 1,592 मिळकत धारकांनी रु. 1 कोटी 83 लाख 73 हजार 829 रक्कम जमा केलेली आहे. तसेच दि.26 ते 30 मार्च 2026 अखेर 80 टक्के सवलत योजनेत शहरातील 4,625 थकबाकीदारांनी लाभ घेतला असून या सवलत योजनेमुळे महानगरपालिकेचा थकीत रक्कम रु.6 कोटी 3 लाख 29 हजार 936 इतका घरफाळा वसूल झाला आहे. नागरिकांना या सवलत योजनेमधून रक्कम रु. 2 कोटी 49 लाख 90 हजार 707 इतकी सवलत मिळाली आहे.
त्याचप्रमाणे उद्या मंगळवार, दि.31 मार्च 2026 रोजी 80 टक्के सवलत योजनेचा शेवटचा दिवस असलेने महापालिकेची सर्व नागरी सुविधा केंद्र सकाळी 9:00 ते सायंकाळी 9:00 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत.
तरी शहरातील जास्तीत जास्त थकबाकी असलेल्या मिळकतधारकांनी 80 टक्के सवलत योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महानगरपालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.
घरफाळा सवलत योजना 80 टक्के सवलतीचा शेवटचा दिवस
|