शैक्षणिक

*आजऱ्यात कै. रमेश टोपले स्मृती बारावे राज्यस्तरीय नाट्य महोत्सव सुरु

Late Ramesh Tople Memorial 12th State Level Theatre Festival begins today


By nisha patil - 7/1/2026 12:34:57 PM
Share This News:



*आजरा(हसन तकीलदार):-आजरा येथील नवनाट्य कलामंच यांचेवतिने बारावा कै. रमेश टोपले स्मृती राज्यस्तरीय नाट्य महोत्सव बुधवार दि. 7/1/2026 ते मंगळवार दि. 13/1/2026 या कालावधीत आजरा महाविद्यालयाच्या रंगमंचावर सायंकाळी 7:00 पासून सुरु होत आहे.नाट्य रसिक प्रेमीसाठी ही एक सुवर्ण पर्वणीच आहे.
     

आजऱ्यातील कलाप्रेमी कै. रमेश टोपले यांच्या स्मृतीपित्यर्थ नवनाट्य कलामंच आजरा यांच्या वतीने दरवर्षी राज्यस्तरीय नाट्यमहोत्सवाचे आयोजन केले जाते. नाट्यप्रेमी रसिकाना ही एक सुवर्ण पर्वणीच असते. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच प्रत्येक वर्षी हा राज्यस्तरीय नाट्यमहोत्सव संपन्न होत असतो. आजरा व आजरा परिसरातील नाट्य रसिकांची नाट्याविषयी अभिरुची संपन्न व्हावी यासाठी विविध विषयावरील, विविध धाटणीची दर्जेदार नाटकें या महोत्सवात आयोजित करण्यात आली आहेत.

 

नाट्यप्रेमी रसिकानी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन नवनाट्य कलामंचचे अध्यक्ष अशोकआण्णा चराटी यांनी केले आहे. या महोत्सवाच्या अध्यक्षस्थानी आनंदा फडके तर उपाध्यक्ष पदी मंगेश तेऊरवाडकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. या नाट्यमहोत्सवात दि. 7 जानेवारी 2026 रोजी भांडा सौख्यभरे, 8 जानेवारी युटोपीया, 9 जानेवारी पोकळ घिस्सा, 10 जानेवारी खानदानी, 11 जानेवारी संगीत कट्यार काळजात घुसली, 12 जानेवारी मी कुमार आणि 13 जानेवारीला बक्षीस वितरण व संयोजक संस्थेचे काळोख देत हुंकार या नाटकाचे सादरीकरण होणार आहे. आजरा महाविद्यालयाच्या रंगमांचावर सायंकाळी 7:00 पासून ही नाटकें सादर करण्यात येणार आहेत.


*आजऱ्यात कै. रमेश टोपले स्मृती बारावे राज्यस्तरीय नाट्य महोत्सव सुरु
Total Views: 153