बातम्या

“बोरपाडळे येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ”

Launch of Healthy Women


By nisha patil - 9/22/2025 2:51:45 PM
Share This News:



“बोरपाडळे येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ”
“आरोग्य जागरूकतेसाठी मोठ्या संख्येने महिलांचा सहभाग”

बोरपाडळे (ता. पन्हाळा) : येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या अभियानाचा शुभारंभ आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते करण्यात आला. या अभियानाचा उद्देश महिलांच्या आरोग्याविषयी जागरूकता वाढवणे व कुटुंब सुदृढ करण्यासाठी आवश्यक सेवा पुरवणे हा आहे.

या वेळी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, पन्हाळा पंचायत समितीचे माजी सभापती अनिल कंदुरकर, बोरपाडळे सरपंच शरद जाधव, वारणा दूध-साखर वाहतूक संघाचे संचालक शिवाजी बिंरजे, एच.आर. पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने, माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. फारूक देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमास पन्हाळा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. शैलेंद्र गायकवाड, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनिया कदम, डॉ. शुभंकर पाटील, डॉ. दीपक लादे, स्त्री रोग तज्ञ डॉ. आशुतोष तराळ, डॉ. जयंत नाईक, डॉ. सत्यजित चरणे, डॉ. दिलीप पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.


“बोरपाडळे येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियानाचा शुभारंभ”
Total Views: 88