बातम्या

आजरा साखर कारखान्यात शेतकरी व तोडणी वाहतुकदार ऍपचे लोकार्पण

Launch of farmer and harvester app at Ajra Sugar Factory


By nisha patil - 11/3/2026 5:17:05 PM
Share This News:



आजरा साखर कारखान्यात शेतकरी व तोडणी वाहतुकदार ऍपचे लोकार्पण


आजरा (हसन तकीलदार ) :- वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये चेअरमन  मुकुंदराव उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांचे शुभहस्ते व संचालक मंडळाच्या उपस्थितीत शेतकरी व तोडणी वाहतुक कंत्राटदार यांच्या ऊसा संदर्भातील माहितीच्या ऍपचे उदघाट्न करून लोकार्पण करणेंत आले. डिजीटल युगाशी सुसंगत पाऊल टाकत शेतकरी, तोडणी कामगार व वाहतुकदारांना पारदर्शक, अचुक व तत्पर माहिती देणेच्या उद्देशांने कारखाना संचालक मंडळांने गडहिंग्लज विभागात प्रथमच आजरा साखर कारखान्यांने सदरचे ऍप तयार करून शेतक-यांना व तोडणी वाहतुक कंत्राटदारांना त्यांचे ऊस व व्यवसायाबाबत इतंभूत माहिती देणारा हा महत्वपुर्ण उपक्रम राबविणेत आलेला आहे. या ऍपमधून संबंधितांना सन 2024-25 गळीत हंगामा पासून हवी असलेली आपल्या ऊसा संदर्भातील माहिती कारखान्यावर प्रत्यक्ष न जाता स्वतःच्या मोबाईलवर उपलब्ध होणार असलेंने सर्व शेतकरी व कंत्राटदारांचा वेळ, खर्च व त्रास वाचणार असून सर्व संबंधितांनी सदरचे ऍप व्हॉट्सअप व लिंकद्वारे डाऊनलोड करून या अधुनिक सुविधेचा लाभ घ्यावा असे कारखान्याचे चेअरमन  मुकुंदराव देसाई यांनी आवाहन केले.
या शेतकरी ऍपची वैशिष्टे अशी कि, शेतकरी ऍपमध्ये आपला कोड नंबर व नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकून लॉगींग करू शकतात. त्यावर प्राप्त झालेला ओटीपी प्रविष्ठ केल्या नंतर शेतक-यांना त्याचे नांव, बैंकेचे नांव, शाखा व अकाउंट नंबर दिसेल त्यानंतर हंगामाचा पर्याय निवडल्यानंतर ऊस गेलेली तारीख, संबंधित स्लिपचे वजन, शेतक-याच्या ऊसाचे एकूण वजन, पाणी भाग, भागिदारी हिस्सा हि माहिती तारखेनुसार सविस्तर पाहता येणार आहे. तसेच ऊस बिलाबाबतची माहिती, बिलाचा कालावधी, ऊस दर, कपाती, निव्वळ देय व बँकेचे नांव हि माहिती मिळेल. तसेच तोडणी वाहतुकदार ऍप मधून डिझेल खरेदी, बिल तपशिल, विविध कपाती, ऍडव्हान्स वसुली तपशिल माहिती आता सहज उपलब्ध होणार आहे. हा उपक्रम शेतकरी व संबंधित घटकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन  सुभाष देसाई, संचालक वसंतराव धुरे,  विष्णुपंत केसरकर, उदयसिंह पोवार, मधुकर देसाई,  मारूती घोरपडे,अनिल फडके,दिपक देसाई,रणजित देसाई,संभाजी पाटील,शिवाजी नांदवडेकर, राजेंद्र मुरूकटे,गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ.मनिषा देसाई, संचालक काशिनाथ तेली,  अशोक तर्डेकर,  हरीभाऊ कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी दिगंबर देसाई, जनरल मैनेंजर (टेक्नि.) एम.आर पाटील, चिफ अकौंटंट  प्रकाश चव्हाण, मुख्य शेती अधिकारी  विक्रमसिंह देसाई, कार्यालय अधिक्षक अनिल देसाई, डे. अकौंटंट रमेश वांगणेकर,एच.आर. मॅनेंजर सुभाष भादवणकर, सिव्हील इंजिनिअर शंकर आजगेकर, ऊस पुरवठा अधिकारी अजित देसाई व कर्मचारी उपस्थित होते. सदर ऍप कारखान्याचे आय.टी. इंजिनिअर  भगवान कांबळे यांच्या मागणी व मार्गदर्शनानुसार मे. अथर्व सॉफ्टवेअर, कोल्हापर यांनी तयार केले आहे.


आजरा साखर कारखान्यात शेतकरी व तोडणी वाहतुकदार ऍपचे लोकार्पण
Total Views: 288