बातम्या
*गवसे, तालुका आजरा येथे सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ
By nisha patil - 9/17/2026 9:51:32 PM
Share This News:
*गवसे, तालुका आजरा येथे सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ
आजरा(हसन तकीलदार):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संविधानिक पदावरील कारकिर्दीला 25 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने दिनांक 17 सप्टेंबर 2026 ते दिनांक 17 ऑक्टोबर 2026 या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सेवा संकल्प अभियान राबविण्यात येत आहे.त्याचाच एक भाग म्हणून गुरुवार दिनांक 17 सप्टेंबर, 2026 रोजी ग्रामपंचायत गवसे, तालुका आजरा येथे सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ आजरा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुभाष सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी मानवी साखळी करून आणि उपस्थित ग्रामस्थांना कापडी पिशव्या वाटप करून सदर अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी दिनांक 17 सप्टेंबर 2026 ते 17 ऑक्टोबर 2026 पर्यंत सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान तसेच, दिनांक 17 सप्टेंबर 2026 ते 2 ऑक्टोंबर 2026 पर्यंत सुरू असलेल्या स्वच्छता सेवा अभियान आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान या तिन्ही अभियानाबाबत सुभाष सावंत ( गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा) यांनी उपस्थित ग्रामस्थांना सखोल माहिती दिली.तसेच, ही तिन्ही अभियाने यशस्वीरित्या पार पाडणेबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी पुजारी (सहाय्यक गट विकास अधिकारी पंचायत समिती आजरा), दिनेश शेटे ( कृषी अधिकारी पंचायत समिती आजरा), बी.टी.कुंभार ( विस्तार अधिकारी पंचायत समिती आजरा), आजरा तालुका संघाचे चेअरमन महादेव हेब्बाळकर,माजी सरपंच सौ. रेखा पाटील,माजी उपसरपंच यल्लाप्पा बागडी, सामाजिक कार्यकर्ते अविनाश हेब्बाळकर,सौ. शैलजा पाटील, तातोबा पाटील, विशाल दुंडगेकर ग्रामपंचायत अधिकारी यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
*गवसे, तालुका आजरा येथे सेवा संकल्प अभियानाचा शुभारंभ
|