बातम्या

“लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारचा अपघात; रिक्षाचालक गंभीर जखमी, राजकीय वाद”

Lavani dancer Gautami Patil

By nisha patil - 4/10/2025 4:03:13 PM
Share This News:

“लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारचा अपघात; रिक्षाचालक गंभीर जखमी, राजकीय वाद”

३० सप्टेंबरच्या पहाटे नवले पुलाजवळ गौतमी पाटीलच्या कारने रिक्षाला धडक दिली. अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी गौतमी पाटीलला नोटीस बजावली असून, घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजची चौकशी सुरू आहे. वाहन चालक संतोष उभे याचे रक्ताचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

राजकीय स्तरावरही वाद पेटले आहेत. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पोलिसांना फोन करून "दोषींवर कडक कारवाई करा" असे सांगितले, तर राष्ट्रवादी आमदार रोहित पवार यांनी यावर टीका केली आहे.

“लावणी नृत्यांगना गौतमी पाटीलच्या कारचा अपघात; रिक्षाचालक गंभीर जखमी, राजकीय वाद”
Total Views: 83