विशेष बातम्या
"९२ लाखांचे लॉन गायब? खासबागेत महापालिकेला कृती समितीची झोड!
By nisha patil - 6/12/2025 5:20:19 PM
Share This News:
"९२ लाखांचे लॉन गायब? खासबागेत महापालिकेला कृती समितीची झोड!
राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदानात तब्बल ९२ लाख खर्चून लावलेले ‘जंपिंग लॉन’ नेमकं कुठे आहे? असा थेट सवाल करत कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तब्बल दीड तास धारेवर धरलं.
आयुक्तांकडून उत्तर न मिळाल्याने समितीने ‘बोंब मारो आंदोलन’ची तयारी केली होती. त्यानंतर शहर अभियंता रमेश मस्कर, अनुराधा वांडरे, सुरेश पाटील यांनी खासबागेची पाहणी केली; मात्र ९२ लाखांचे लॉन दाखवण्यात ते अपयशी ठरले.
लॉन नसल्यास चोरीची पोलिस तक्रार देऊ, असा इशारा समितीने दिला. दबाव वाढताच अधिकाऱ्यांनी १ फेब्रुवारीला जलतरण तलाव व उद्याने सुरू करण्याचे आश्वासन देत काढता पाय घेतला.
घटनास्थळी राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमते आदी कार्यकर्ते उपस्थित.
"९२ लाखांचे लॉन गायब? खासबागेत महापालिकेला कृती समितीची झोड!
|