बातम्या
नेत्यांची दिवाळी , शेतकऱ्यांचे दिवाळं!” — घोषणाबाजीने गोकुळ मोर्चात संतापाचा उद्रेक!
By nisha patil - 10/16/2025 11:40:09 AM
Share This News:
कोल्हापुर: गोकुळ दूध संघाकडून दूध संकलक संस्थांचे पैसे मनमानी पद्धतीने कपात केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापुरात घेतलेल्या “जवाब दो मोर्चा” दरम्यान शेतकऱ्यांचा संताप उफाळला.
शासकीय विश्रामगृह ते धैर्यप्रसाद हॉल मार्गे गोकुळ दूध संघ कार्यालय, ताराबाई पार्क या मार्गावर शेकडो गाई-म्हशींसह हजारो दूध उत्पादक शेतकरी सहभागी झाले.
मोर्चाचे नेतृत्व शौमिका महाडिक करत असून, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी गोकुळ संघाकडून जाब मागण्यात आला.
मोर्चादरम्यान शेतकऱ्यांनी “नेत्यांची दिवाळी – शेतकऱ्यांचे दिवाळं”, “दूध आमचं, निर्णय तुमचा चालणार नाही” अशा घोषणा देत जोरदार निषेध व्यक्त केला.
मोर्चाच्या मार्गावर ठिकठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जिल्ह्यातील दूध उत्पादकांमध्ये या आंदोलनामुळे प्रचंड असंतोष दिसून येत आहे.
नेत्यांची दिवाळी , शेतकऱ्यांचे दिवाळं!” — घोषणाबाजीने गोकुळ मोर्चात संतापाचा उद्रेक!
|