बातम्या
"लर्न, कोलाब्रेट, एक्सलन्स" ही यशाची त्रिसूत्री – रितुराज टी. पाटील
By nisha patil - 4/26/2025 12:25:45 AM
Share This News:
"लर्न, कोलाब्रेट, एक्सलन्स" ही यशाची त्रिसूत्री – रितुराज टी. पाटील
कसबा बावडा, कोल्हापूर – डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी येथे आयोजित ‘टेक्नोत्सव २०२५’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत १८०० हून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ‘मौरीटेक, हैद्राबाद’चे असोसिएट डायरेक्टर रितुराज टी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना “लर्न, कोलाब्रेट आणि एक्सलन्स” या त्रिसूत्रीचा उपयोग करून यशस्वी होण्याचा संदेश दिला.
या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, गोवा आदी राज्यांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विविध विभागांतून सेतू बांधा रे, रोबो रेस, टेक डिबेट, अँड्रॉइड डेव्हलपमेंट, प्रोजेक्ट कॉम्पिटिशन यासारख्या उपक्रमांमध्ये स्पर्धा घेण्यात आल्या.
२.५ लाखांची पारितोषिकं देण्यात आली.
विश्वस्त ऋतुराज संजय पाटील यांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. संतोष चेडे, डॉ. ए. के. गुप्ता, डॉ. प्रशांत जगताप, डॉ. कपिल कदम यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास डॉ. संजय डी. पाटील, आ. सतेज डी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
"लर्न, कोलाब्रेट, एक्सलन्स" ही यशाची त्रिसूत्री – रितुराज टी. पाटील
|