शैक्षणिक
वसुंधरा दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालयामध्ये व्याख्यान संपन्न
By nisha patil - 4/22/2025 8:25:35 PM
Share This News:
वसुंधरा रक्षणासाठी युवकांनी सहभागी व्हावे - डॉ. गोवर्धन उबाळे
वसुंधरा दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालयामध्ये व्याख्यान संपन्न
कोल्हापूर दि.२२ : वसुंधरा दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालयामध्ये डॉ. गोवर्धन उबाळे, भूगोल विभाग प्रमुख यांचे पर्यावरण संवर्धनामध्ये युवकांची भूमिका या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. सौ. शिल्पा भोसले, विभाग प्रमुख (ज्यूनिअर आर्ट्स -कॉमर्स) या होत्या.
यावेळी बोलताना डॉ. उबाळे यांनी वसुंधरा दिनाचे महत्त्व पटवून देत वसुंधरा दिन साजरा करण्यामागील कारणे व उद्देश विद्यार्थ्यांसमोर PPT द्वारे मांडली. हवामान बदल, प्रदूषण, लोकसंख्या वाढ वृक्षतोड इत्यादीमुळे आज पृथ्वीवरील अवघ्या मानव जातीसमोर मोठे संकट उभा ठाकले आहे. मोठ्या प्रमाणात जैवविविधता ऱ्हास होत आहे. यासाठी युवकानी या सुंदर अशा वसुंधरेच्या शाश्वत भविष्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनात छोट्या छोट्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. वृक्षारोपण, ऊर्जेची बचत, पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. 'वसुंधरा माझी माता’ या कवितेचे वाचनही त्यांनी केले. यावेळी पर्यावरण विभागाकडून 'देशी वृक्ष बिया संकलन’ या उपक्रमाची सुरुवात प्रा.सौ.शिल्पा भोसले यांच्या हस्ते करण्यात आली.
स्वागत व प्रास्ताविक प्रा.सौ.शिल्पा भोसले यांनी केले. आभार प्रा ए.आर. धस, (पर्यावरण विभाग) यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा.सौ. वेदांते एस. पी व प्रा.सौ.गायकवाड ए. बी. यांनी केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार व रजिस्ट्रार .आर.बी.जोग यांचे मार्गदर्शन लाभले.
यावेळी स्टाफ सेक्रेटरी प्रा. व्ही. एन.कुलकर्णी, प्रा.सौ. हिरकुडे यू.आर, प्रा.तिजाईकर यू. एच,
प्रा. डी.आर.पाटील, प्रा.सौ.देशपांडे एम.एस, प्रा. रोटे एस ए, प्रा.राठोड पी. वाय, प्रा.भरमगोंडा जे आर. प्रा.कोळी बी.एस, प्रा.सुतार (B.Voc विभाग) तसेच ज्युनिअर आर्ट्स कॉमर्स विभागातील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
वसुंधरा दिनानिमित्त विवेकानंद महाविद्यालयामध्ये व्याख्यान संपन्न
|