बातम्या
विवेकानंद महाविदयालयात ‘भारतीय संविधान जागृती’ विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 7/10/2025 5:08:57 PM
Share This News:
विवेकानंद महाविदयालयात ‘भारतीय संविधान जागृती’ विषयावर व्याख्यान संपन्न
कोल्हापूर दि. 7 : येथील विवेकानंद महाविद्यालयामध्ये अनुलोम सामाजिक संस्था व विवेकानंद कॉलेज एन एस एस विभाग यांच्या वतीने भारतीय संविधान जागृती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी व्याख्याते डॉ. घनश्याम दीक्षित, सिनेट सदस्य, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांनी भारतीय राज्यघटने विषयी माहिती दिली. यामध्ये त्यांनी नागरिकांची मूलभूत कर्तव्य व अधिकार सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राज्यघटना आपल्या घटना समितीतील सदस्यासोबत पूर्ण अभ्यास करून 2 वर्षे 11 महिने 18 दिवसात निर्माण केली. भारतीय राज्यघटना ही कायदेशीर दस्तऐवज आहे. संविधानामध्ये असणाऱ्या विविध कलमांची माहिती त्यांनी करून दिली.
अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य डॉ. आर.आर. कुंभार म्हणाले, वाढत्या प्रदूषणामुळे सध्या होणारे वातावरणीय बदल यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणाविषयी जागरूक रहावे असे आवाहन केले. तसेच संविधानाला दहशतवाद व जातीयवाद यासारखे धोके याची जाणीव करून दिली. या वर्षी आपल्या भारतीय संविधानाला 75 वर्षे पूर्ण होत आहे. त्या अनुषंगाने नागरिकत्वाचे महत्व पटवून देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.एस.टी. शिंदे यांनी केले. तर आभार प्रा.एच.जी.पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा विश्वंभर कुलकर्णी यांनी केले. यावेळी विभागप्रमुख प्रा सौ. शिल्पा भोसले व प्रा एम आर नवले उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन महाविदयालयाचे प्राचार्य डॉ.आर.आर.कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रा. हेमंत पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा एल एस नाकाडी, व प्रा.ए.आर.धस, प्रा सौ शुभांगी पाटील, प्रा वर्षा महाडिक, प्रा डॉ. अभिजीत पाटील ज्युनिअर कॉलेजचे एन.एस.एस. चे विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद महाविदयालयात ‘भारतीय संविधान जागृती’ विषयावर व्याख्यान संपन्न
|