बातम्या
विवेकानंद मध्ये ‘करिअर मार्गदर्शन’ विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 12/13/2025 5:13:21 PM
Share This News:
विवेकानंद मध्ये ‘करिअर मार्गदर्शन’ विषयावर व्याख्यान संपन्न
कोल्हापूर दि.13: रोटरॅक्ट क्लब ऑफ विवेकानंद कॉलेज, आय.क्यु.ए.सी. विभाग व कॉलेजच्या NCC विभागाच्या सहकार्याने युवकांसाठी करिअर मार्गदर्शन या विषयावर ६ महाराष्ट्र गर्ल्स एन.सी.सी. कोल्हापूरचे कमांडिंग ऑफिसर कर्नल विक्रम नलवडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणातून विद्यार्थ्यांना करिअर निवड, शिस्त, नेतृत्वगुण, देशसेवा तसेच आत्मविश्वासाचे महत्त्व अत्यंत प्रभावीपणे विशद केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत युवकांना योग्य दिशेने वाटचाल करण्यासाठी प्रेरित केले. कॉलेज जीवनातील संधींची निवड आयुष्याची दिशा ठरविते. असे प्रतिपादन केले. हा कार्यक्रम विवेकानंद महाविद्यालयाच्या ग्रंथालय सभागृहात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस.पी थोरात हे होते.
कार्यक्रमाची सुरुवात रोपास पाणी घालून व शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे यांच्या स्वरचित प्रार्थनेने झाली.
पाहुण्यांची ओळख कॅडेट सृष्टी पाटील व छावी यादव यांनी करुन दिली. आभार लेफटनंट जे.आर.भरमगोंडा यांनी मानले. हा कार्यक्रम आय. क्यू. ए. सी प्रमुख डॉ श्रूती जोशी, मेजर सुनिता भोसले, कलब प्रेसिडेंट अबीद मणेर, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री एस के धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी पार पडला.
या प्रसंगी महाविद्यालयातील प्रा.एच.जी.पाटील, प्रा के जे. गुजर, क्लब मेंबर, विद्यार्थी-विद्यार्थिनी, एनसीसी कॅडेट्स, विवेकानंद ॲकेडेमीचे विद्यार्थी तसेच प्राध्यापक उपस्थित होते.
विवेकानंद मध्ये ‘करिअर मार्गदर्शन’ विषयावर व्याख्यान संपन्न
|