बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये Data Analytics and Visualization Using Qlik Sense विषयावर व्याख्यान संपन्न्ा
By Administrator - 12/16/2025 3:00:17 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये Data Analytics and Visualization Using Qlik Sense विषयावर व्याख्यान संपन्न्ा
कोल्हापूर दि.16 : येथील विवेकानंद कॉलेज मध्ये बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स् (एंटायर) विभागाच्या वतीने तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी Data Analytics and Visualization Using Qlik Sense विषयावर अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्रमुख वक्ते महणून श्री.ओंकार कोकरे हे उपस्थित होते. त्यांनी डेटा ॲनालिटीक्सचे महत्व आणि व्यवसाय तसेच डेटा व्हिज्युलायझेशनसाठी वापरल्या जाणाऱ्या विविध साधनांची आणि तंत्रांची Qlik Sense फलॅटफॉर्मवर प्रात्यक्षिकासह माहिती दिली.
या व्याख्यानाचे आयोजन प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात , बी.एस्सी. कॉम्प्युटर सायन्स (एंटायर) विभागप्रमुख प्रा. पल्लवी देसाई , प्रा आर. आर. माने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. या व्याख्यानासाठी विभागातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.
विवेकानंद कॉलेजमध्ये Data Analytics and Visualization Using Qlik Sense विषयावर व्याख्यान संपन्न्ा
|