शैक्षणिक

व्यंकटराव येथे 'पर्यावरण संवर्धन' या विषयावर व्याख्यान संपन्न

Lecture on Environmental Conservation concluded at Venkatrao


By Administrator - 2/28/2026 12:13:54 PM
Share This News:



व्यंकटराव येथे 'पर्यावरण संवर्धन' या विषयावर व्याख्यान संपन्न


आजरा(हसन तकीलदार) :- २६ फेब्रुवारी २०२६रोजी ​आजरा येथील व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘पर्यावरण सेवा योजना’ अंतर्गत “मानव-वन्यजीव संघर्ष… पर्यावरण संवर्धन” या विषयावर एका विशेष मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
निसर्ग आणि मानवाचा संवाद
​या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते कोल्हापूर जिल्ह्यातील वनक्षेत्रपाल  दत्तात्रय पाटील यांनी आपल्या खास शैलीत विद्यार्थ्यांशी ‘वनगुज’ साधले. त्यांनी रानकुत्रा आणि साळींदर यांच्या रंजक गोष्टी सांगून ‘जीवो जीवस्य जीवनम्’ या सूत्राचा अर्थ स्पष्ट केला. जंगलातील सफारीचा अनुभव देत त्यांनी वन्यजीवांचे महत्त्व आणि पर्यावरणीय समतोल कसा राखावा, याचे सखोल मार्गदर्शन केले. तसेच, अचानक एखादा वन्यप्राणी समोर आल्यास कोणती खबरदारी घ्यावी, याबाबत मोलाच्या टिप्स दिल्या.
​ विद्यार्थ्यांसाठी अनमोल संदेश
​केवळ पर्यावरणावरच नव्हे, तर श पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक विकासावरही भाष्य केले. त्यांनी खालील महत्त्वाचे संदेश दिले:

​प्रामाणिक कष्ट करा.​आई-वडील आणि गुरुजनांचा आदर करा.​व्यसनाधीनतेपासून दूर राहा.​मुलींनी स्वसंरक्षणासाठी स्वावलंबी बना.
​​या कार्यक्रमाला प्रशालेचे प्राचार्य  एम. एम. नोगुर्डेकर , पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार , सौ. आर. एन. पाटील , सौ. ए. डी. पाटील ,  एम. ए. पाटील , प्रकाश पाटील-आर्दाळकर  उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन पर्यावरण सेवा विभागाचे प्रमुख एस. वाय. भोये व सौ. ए. एस. गुरव यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी व्यंकटराव ज्युनिअर कॉलेजचे व्यवस्थापक  एम. ए. पाटील सरांनी सर्वांचे आभार मानले.


व्यंकटराव येथे 'पर्यावरण संवर्धन' या विषयावर व्याख्यान संपन्न
Total Views: 82