बातम्या
विवेकानंद महाविद्यालयात ‘आरोग्याची गुरुकिल्ली : अॅक्युप्रेशर’ या विषयावरील व्याख्यान संपन्न
By Administrator - 11/3/2026 4:26:10 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात ‘आरोग्याची गुरुकिल्ली : अॅक्युप्रेशर’ या विषयावरील व्याख्यान संपन्न
दि. ११ : येथील विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथे महिला सक्षमीकरण कक्ष (सचेतना मंडळ), संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे महिला अध्ययन केंद्र, आय. सी. सी, एन. सी. सी आणि अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने
‘आरोग्याची गुरुकिल्ली : अॅक्युप्रेशर’ या विषयावर विशेष अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या प्रार्थनेने व रोपाला पाणी घालून करण्यात आली. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी केले. या प्रसंगी अॅक्युप्रेशर तसेच लाठीकाठी आणि झुंबा यांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात आले. तसेच २५ फेब्रुवारी ते ७ मार्च २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या झुंबा कार्यशाळेतील सहभागी विद्यार्थिनींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून सौ. गीतांजली माने यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. अॅक्युप्रेशर ही एक नैसर्गिक आणि सोपी उपचारपद्धती असून शरीरातील विविध बिंदूंवर योग्य दाब दिल्यास अनेक आजारांपासून आराम मिळू शकतो. नियमित अॅक्युप्रेशर केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते, तणाव कमी होतो आणि शरीरातील ऊर्जा संतुलित राहते. त्यांनी विशेषतः महिलांनी आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे असे सांगितले. घर आणि कामाच्या जबाबदाऱ्या सांभाळताना महिलांकडे स्वतःसाठी वेळ कमी असतो, त्यामुळे अॅक्युप्रेशरसारख्या सोप्या पद्धतीचा अवलंब केल्यास आरोग्य चांगले राखता येते. अॅक्युप्रेशरचा योग्य वापर केल्यास औषधांवरील अवलंबित्व कमी होऊन निरोगी जीवन जगता येते, असेही त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. सी. बी. पाटील यांनी सांगितले की, आरोग्य हेच खरे संपत्ती आहे आणि निरोगी शरीरातच निरोगी मन वसते. आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. अॅक्युप्रेशरसारख्या पारंपरिक उपचारपद्धतींचे महत्त्व आजच्या काळात वाढत आहे.महाविद्यालयाच्या महिला सक्षमीकरण कक्ष विद्यार्थिनींच्या व स्टाफ च्या सर्वांगीण विकासासाठी अशा प्रकारचे उपयुक्त कार्यक्रम आयोजित करते ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुप्रिया पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. कविता तिवडे यांनी केले. या कार्यक्रमासाठी डॉ. श्रुती जोशी, व महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री. सचिन धनवडे यांचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी झुम्बा कार्यशाळेचे प्रशिक्षक ओंकार शेटे, डॉ. उर्मिला खोत, मेजर सुनीता भोसले, रविराज सुतार तसेच प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी व सेवक बहुसंख्येने उपस्थि होते.
विवेकानंद महाविद्यालयात ‘आरोग्याची गुरुकिल्ली : अॅक्युप्रेशर’ या विषयावरील व्याख्यान संपन्न
|