बातम्या
विवेकानंद मध्ये प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने रेशीमशास्त्र विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 11/27/2025 11:43:41 AM
Share This News:
विवेकानंद मध्ये प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने रेशीमशास्त्र विषयावर व्याख्यान संपन्न
कोल्हापूर दि. 27 : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर (अधिकार प्रदत्त स्वायत्त संस्था) येथील प्राणिशास्त्र विभागमार्फत दिनांक 26 नोव्हेंबर 2025 रोजी "Exploring Sericulture: From Cocoon to Career" या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दुपारी 2.00 वाजता रोपांना पाणी देऊन औपचारिक उद्घाटनाने झाली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात होते. या व्याख्यानासाठी डॉ. आर. पी. कावणे, सहाय्यक प्राध्यापक, प्राणिशास्त्र विभाग, यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालय, वारणानगर, यांना आमंत्रित करण्यात आले होते. पाहुणे वक्त्यांची ओळख जी. एच. फडके यांनी करून दिली, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. एम. एल. पाटील यांनी केले. प्रास्ताविक डॉ. टी. सी. गौपाले यांनी करत विद्यार्थ्यांना रेशीमशास्त्राचे उद्योगक्षेत्रातील आणि संशोधनातील महत्त्व स्पष्ट केले. त्यानंतर पाहुणे वक्ते डॉ. कावणे यांनी रेशीम उद्योगाचा इतिहास, किड्यांचे संगोपन, करिअरच्या संधी, प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि रोजगारक्षमता याविषयी अत्यंत उपयुक्त माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देत त्यांनी परस्परसंवाद साधला.
कार्यक्रमाच्या शेवटी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. थोरात यांनी विद्यार्थ्यांनी अशा उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभागी व्हावे आणि कौशल्याधारित शिक्षणाकडे वाटचाल करावी असे आवाहन केले. विद्यार्थ्यांच्या अभिप्राय सत्रानंतर कु. एन. ए. पटेल यांनी आभारप्रदर्शन केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये रेशीमशास्त्र विषयाविषयीची जिज्ञासा व करिअरच्या नव्या संधींबद्दलची जाणीव अधिक दृढ झाली. हा कार्यक्रम प्राणीशास्त्र विभागप्रमुख डॉ. जी. के. सोनटक्के आणि IQAC समन्वयक डॉ. श्रुती जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली, प्राणिशास्त्र विभागातील सर्व शिक्षकांच्या एकत्रित प्रयत्नाने यशस्वीपणे पार पडला. या व्याख्यानासाठी बी. एस्सी व एम एस्सी चे एकुण ४० विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद मध्ये प्राणिशास्त्र विभागाच्या वतीने रेशीमशास्त्र विषयावर व्याख्यान संपन्न
|