बातम्या

शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘महिला सक्षमीकरण, बदलते विश्व आणि समानता’ विषयावर व्याख्यान

Lecture on Women Empowerment


By Administrator - 9/3/2026 2:54:07 PM
Share This News:



शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘महिला सक्षमीकरण, बदलते विश्व आणि समानता’ विषयावर व्याख्यान

कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेच्या श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, कोल्हापूर येथील स्त्री व्यक्तिमत्त्व विकास समितीच्या वतीने सोमवार, दि. ९ मार्च २०२६ रोजी महर्षी वि. रा. शिंदे सभागृहात “महिला सक्षमीकरण, बदलते विश्व आणि समानता” या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रार्थनेने झाली.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. डॉ. एस. एस. राठोड यांनी केले. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रा. डॉ. शैलजा श्रीरंग मंडले (सहयोगी प्राध्यापक, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर) उपस्थित होत्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी बदलत्या आधुनिक जगात महिलांनी शिक्षण, कौशल्य आणि आत्मविश्वासाच्या बळावर विविध क्षेत्रात प्रगती करावी तसेच समानतेची जाणीव ठेवून समाजात सक्रिय भूमिका बजावावी, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहाजी छत्रपती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी महिलांचे सक्षमीकरण हे समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत विद्यार्थिनींनी शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे मार्गदर्शन केले.

यावेळी प्रा. डॉ. आर. डी. मांडणीकर, प्रा. डॉ. ए. बी. बलुगडे,  आर. जे. भोसले व  एम. व्ही. भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रज्ञा भाटे यांनी केले, तर डॉ. सारिका कांबळे यांनी आभार मानले. कार्यक्रमास विद्यार्थिनी व प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


शहाजी छत्रपती महाविद्यालयात ‘महिला सक्षमीकरण, बदलते विश्व आणि समानता’ विषयावर व्याख्यान
Total Views: 16