बातम्या

आजरा महाविद्यालयात कायदेविषयक व्याख्यान संपन्न

Lecture on law concluded at Ajra College


By nisha patil - 12/3/2026 11:06:47 PM
Share This News:



आजरा महाविद्यालयात कायदेविषयक व्याख्यान संपन्न
 

आजरा (हसन तकीलदार )*:-महाविद्यालयाच्या अंतर्गत तक्रार निवारण समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त  महिला विषयक कायदे या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी वकील सौ. प्रतिमा सरदेसाई महागांवकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी या विषयावर बोलताना, महिलांच्यासाठी सद्या  अस्तित्वात असणारे कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा, सायबर कायदा, मोटार वाहन कायदा व पोस्को कायदा या सर्व कायद्याची सविस्तर माहीती उदाहरणासहीत दिली. त्या म्हणाल्या की,हे सर्व कायदे महिलांच्या संरक्षणा साठी व सुरक्षिततेसाठी करण्यात आलेले आहेत पण त्याचा तेवढाच गैर वापर वाढला आहे.

तुम्हीही कायद्याचा गैर वापर करू नका असा सल्ला विद्यार्थी विद्यार्थीनींना दिला. तात्काळ मदतीसाठी काही नंबर ही त्यांनी  सर्वांना सांगितले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून बोलताना प्राचार्य डॉ. सादळे ए. एन. म्हणाले रूढी आणी परंपरामुळे महिलांवरती अनेक निर्बंध लादण्यात आली पण आता कायद्याने त्यांना संरक्षण मिळाले आहे. या वेळी उपस्थित उपप्राचार्य संकपाळ डी.पी. यांनीही विद्यार्थांना मार्गदर्शन केले.
 

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. सौ. वैशाली देसाई व आभार प्रा. व्ही. एम. देसाई यांनी मानले. या संपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन प्रा. डॉ. लता शेटे यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व महिला प्राध्यापिका उपस्थित होत्या.


आजरा महाविद्यालयात कायदेविषयक व्याख्यान संपन्न
Total Views: 4