शैक्षणिक
व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेती या विषयावर व्याख्यान संपन्न
By nisha patil - 2/24/2026 11:09:05 AM
Share This News:
व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेती या विषयावर व्याख्यान संपन्न
आजरा(हसन तकीलदार): येथील पर्यावरण सेवा योजना अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी नैसर्गिक व पारंपरिक शेती या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आज शेतीसाठी जमीन वाढवू शकत नाही परंतु आहे त्या शेत जमिनीत पिकाचे उत्पादन नक्कीच वाढवू शकतो. शेतीला व्यवसायिक दृष्टिकोनातून पहिले पाहजे. तरुणांच्यामध्ये शेतीविषयी आकर्षण निर्माण केले पाहिजे. आधुनिकतेतून सेंद्रिय शेती करणे गरजेचे आहे. यासाठी व्याख्यान आयोजन केले होते.
व्याख्याते अजित जीवबा हरेर यांनी अतिशय सुंदर आणि सोप्या पद्धतीने मुलांना मार्गदर्शन केले.आजची पिढी शेती पासून लांब जात असली तरी कशा पद्धतीने आपण आपल्या घरात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांचा वापर करून परड्यात किंवा टेरेस वर छोटी छोटी पीक घेऊ शकतो ते सांगितले.रासायनिक खत आणि सेंद्रीय खत यातील फरक,सेंद्रीय खत कसे तयार करावे,पिकांना पाणी किती प्रमाणात आणि कसे द्यावे.रासायनिक खतांवर पिकणाऱ्या पिकांचा शरीरावर होणारा परिणाम असे अनेक घटक हरेर यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितले.त्यांच्या माहितीतून त्यांची या विषयावर असणारी पकड आणि अभ्यास लक्षात येते. या नवोपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये निश्चितच शेतीबद्दल आवड निर्माण होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्राचार्य एम.एम. नागुर्डेकर, पर्यवेक्षिका सौ. व्ही.जे. शेलार, पाटील- अर्दाळकर , उपस्थित होते.कार्यक्रमाचे आयोजन पर्यावरण विभाग प्रमुख एस.वाय.भोये व सौ. ए. एस.गुरव यांनी केले.
व्यंकटराव येथे विद्यार्थ्यांना नैसर्गिक व पारंपारिक शेती या विषयावर व्याख्यान संपन्न
|