बातम्या
विवेकानंद कॉलेजमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त व्याख्यान
By nisha patil - 7/10/2025 5:07:05 PM
Share This News:
विवेकानंद कॉलेजमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त व्याख्यान
कोल्हापूर दि. 7 - येथील विवेकानंद कॉलेजमध्ये मराठी विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि जिल्हा मराठी भाषा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने अभिजात मराठी भाषा सप्ताहा निमित्त प्रा. श्रीराम मोहिते यांचे 'अभिजात मराठी भाषेचे संवर्धन' या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी बोलताना ते म्हणाले, 'भाषा लोकांना जोडून ठेवण्याचे काम करते. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मराठी भाषेचा गौरव केला. भाषेच्या माध्यमातून शब्दांशी मैत्री व्हायला हवी. '
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर आर कुंभार होते. कार्यक्रमाची सुरुवात शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे रचित संस्था प्रार्थनेने झाली. प्रास्ताविक व स्वागत मराठी विभाग प्रमुख डॉ. एकनाथ आळवेकर यांनी केले. आभार प्रा डॉ. प्रदीप पाटील यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. रोहिणी रेळेकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्रा.डॉ.दत्ता जाधव, प्रा. अनिल जांभळे, विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विवेकानंद कॉलेजमध्ये अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त व्याख्यान
|