बातम्या
विवेकानंद मध्ये ‘ संविधान दिन ’ निमित्त व्याख्यान संपन्न
By nisha patil - 11/27/2025 11:47:02 AM
Share This News:
विवेकानंद मध्ये ‘ संविधान दिन ’ निमित्त व्याख्यान संपन्न
कोल्हापूर दि. 27 : विवेकानंद ज्युनिअर महाविद्यालयाच्या वतीने संविधान दिन उपक्रम आयोजित करण्यात आला. संविधान दिना निमित्त भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न्ा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच संविधानाच्या उद्देशिका / प्रस्तावनाचे सामुहिक वाचन करण्यात आले. या उपक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून विवेकानंद महाविद्यालयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. अवधूत टिपुगडे लाभले होते.
संविधान दिनाअंतर्गत डॉ. टिपूगडे यांनी संविधान म्हणजे काय व त्याचा समाजाला काय उपयोग होतो याची माहिती दिली. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना लिहून पूर्ण झाली व 26 जानेवारी 1950 पासून राज्यघटनेनुसार भारताचे कामकाज सुरू झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यांचे सहकारी यांनी संविधान तयार केले. जगातील इतर देशांच्या घटनांचा अभ्यास करून भारताला लागू होईल अशी घटना तयार केली. पारतंत्र्यात अडकलेल्या समाजातून निर्माण झालेला जो समाज त्याला कोणते नियम, कायदे, अधिकार, कर्तव्य द्यावीत याबाबत 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढे दिवस अभ्यास करून आपले संविधान तयार झाले.
महाराष्ट्र शासनाच्या उपक्रमांतर्गत संविधान दिन हा उपक्रम महाविद्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी संविधान उद्देश पत्रिकेचे वाचन विद्यार्थ्यांच्याकडून करून घेण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. सौ शिल्पा भोसले यांनी आपल्या भाषणात संविधानाची गरज का आहे हे सांगितले. तसेच या उपक्रमाचे आयोजन NSS कार्यक्रम अधिकारी प्रा.एच.जी.पाटील व राज्यशास्त्र विषयाचे प्रा. पाटील डी. आर. यांनी केले. कार्यक्रमासाठी प्रा.एम.आर.नवले, प्रा.एस.टी.शिंदे, प्रा. ए. आर. धस, प्रा. पाटील एस. एन., प्रा. वेदांते एस.पी., प्रा. कुटिन्हो एल. आर. उपस्थित होत्या. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.एस. पी. थोरात यांचे मार्गदर्शन लाभले व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आर्ट्स कॉमर्स विभागाचे स्टाफ सेक्रेटरी प्रा. बी. एस. कोळी यांनी केले.यावेळी महाविद्यालयाचे रजिस्ट्रार श्री.एस.के.धनवडे,ज्युनिअर कॉलेज मधील प्राध्यापक, एन.एस.एस. चे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
विवेकानंद मध्ये ‘ संविधान दिन ’ निमित्त व्याख्यान संपन्न
|