विशेष बातम्या
विवेकानंद महाविद्यालयात मानवाधिकार दिनानिमित्त ‘तो, ती आणि ते’ विषयावर व्याख्यान
By nisha patil - 11/12/2025 5:29:03 PM
Share This News:
विवेकानंद महाविद्यालयात मानवाधिकार दिनानिमित्त ‘तो, ती आणि ते’ विषयावर व्याख्यान
कोल्हापूर दि 11 : विवेकानंद महाविद्यालय, कोल्हापूर येथील अर्थशास्त्र विभाग आणि संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे स्त्री अभ्यास केंद्राच्या संयुक्त विद्यमाने मानवाधिकार दिनानिमित्त ‘तो, ती आणि ते’ या विषयावर एक उपयुक्त व विचारप्रवर्तक अतिथी व्याख्यान आयोजित करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. कैलास पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी मानवाधिकार दिनाचा इतिहास व महत्त्व स्पष्ट करत समानता, मानवी प्रतिष्ठा आणि स्वातंत्र्य या सार्वत्रिक मूल्यांचे महत्व स्पष्ट केले
बी.कॉम. भाग १ मधील समृद्धी चौगुले व रिषित प्रसाद या विद्यार्थ्यांनी मानवाधिकारांवर आपली मते व्यक्त करत आजच्या युवा पिढीची कर्तव्ये व जबाबदाऱ्या अधोरेखित केल्या.
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या डॉ. प्रतिभा पैलवान, संस्थापक – राजहंस फाऊंडेशन यांनी आपले अनुभव मांडताना तृतीयपंथी समाजाला भेडसावणाऱ्या समस्या व समाजातील वास्तव परिस्थिती अत्यंत प्रभावीपणे विशद केली. त्यांच्या भाषणामुळे उपस्थितांमध्ये लिंगओळख, स्वीकारशीलता आणि सामाजिक संवेदनशीलतेबाबत जाणीव निर्माण झाली.
अध्यक्षीय भाषणात प्रभारी प्राचार्य डॉ. एस. पी. थोरात यांनी अशा संवेदनशील विषयांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती होणे अत्यंत आवश्यक असल्याचे सांगितले व विद्यार्थ्यांनी सामाजिक जबाबदाऱ्या सकारात्मकतेने व सहृदयतेने पार पाडाव्यात असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजन डॉ. संपदा टिपकुर्ले यांनी केले. कार्यक्रमाचा समारोप प्रा. ए. बी. वसेकर यांच्या आभारप्रदर्शनाने झाला. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
विवेकानंद महाविद्यालयात मानवाधिकार दिनानिमित्त ‘तो, ती आणि ते’ विषयावर व्याख्यान
|