बातम्या
कागल विवेकानंद कॉलेजमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
By nisha patil - 12/11/2025 3:12:18 PM
Share This News:
कागल विवेकानंद कॉलेजमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
कोल्हापूर दि 12 : येथील विवेकानंद कॉलेजमध्ये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांचेमार्फत ज्युनिअर आर्टस, कॉमर्स व सायन्स मधील विद्यार्थी, विद्यार्थिनींना कायदेशीर बाबींची माहिती व्हावी म्हणून कायदेविषयक मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात श्रीमती डी.ए.डोईफोडे, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ् स्तर , कोल्हापूर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी पोस्को कायदया विषयीची माहिती व मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या विषयी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण विषयी माहिती दिली. प्रास्ताविक व स्वागत प्रा. डी. आर. पाटील यांनी केले व आभार सायन्स्ा विभागप्रमुख प्रा. एम. आर. नवले यांनी मानले.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. या कायक्रमासाठी ज्युनिअर आर्टस कॉमर्स विभागप्रमुख प्रा.सौ शिल्पा भोसले, स्टाफ सेक्रेटरी प्रा एस टी शिंदे यांचे सहकार्य लाभले. यावेळी प्रा एल एस नाकाडी, प्रा पी एन कांबळे, प्रा.एच.जी.पाटील व प्राध्यापक, विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.
कागल विवेकानंद कॉलेजमध्ये कायदेविषयक मार्गदर्शन शिबीर संपन्न
|