ताज्या बातम्या
उपवळेत बिबट्याचा हल्ला; बालिका जखमी, जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांची रुग्णालयात भेट
By nisha patil - 8/1/2026 3:42:27 PM
Share This News:
उपवळे (ता. शिराळा) येथे बुधवारी रात्री सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात स्वरांजली संग्राम पाटील या बालिकेला दुखापत झाली. हल्ल्यानंतर तिला तातडीने शिराळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांनी रुग्णालयात भेट देऊन स्वरांजलीच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक बनसोडे, शिराळा वन विभागाचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी, तसेच वनपाल अनिल वाजे उपस्थित होते.
रणधीर नाईक यांनी डॉ. बनसोडे यांच्याकडून रुग्णाच्या उपचारांबाबत सविस्तर माहिती घेतली. तसेच घटनेचा पंचनामा करून शासनाकडून तातडीने मदत मिळावी, यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रस्ताव पाठवण्याबाबत वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्याशी चर्चा केली.
यावेळी माजी उपसरपंच दादासो गुरव, संग्राम पाटील, माजी सरपंच सुनील गायकवाड, प्रवीण पाटील, सुरेश गुरव, स्वप्नाली पाटील आदी उपस्थित होते.
उपवळेत बिबट्याचा हल्ला; बालिका जखमी, जिल्हा परिषद माजी सदस्य रणधीर नाईक यांची रुग्णालयात भेट
|